मुंबई : भारतात अनेक लोक हृदयविकाराने त्रस्त आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. नुकतंच कार्डिओ व्हॅस्कुलर डिसीजमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. हृदयविकारामुळे 20 ते 40 वयोगटातील लोकांनाही या काळात जीव गमवावा लागला आहे. आनुवंशिकता, मधुमेह, धूम्रपान-दारू आणि खराब जीवनशैली याशिवाय कोलेस्टेरॉलची वाढती पातळी हे हृदयविकाराचं प्रमुख कारण मानलं जातं.
कोलेस्ट्रॉलची लक्षणं सुरुवातीला फारशी गंभीर नसतात पण जर तुम्हाला वाईट कोलेस्टेरॉलचा त्रास दीर्घकाळ होत असेल तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करून तुम्ही हा कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखू शकता.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या पण महत्त्वाच्या खाद्यपदार्थाबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करून काही आठवड्यांत उच्च कोलेस्ट्रॉल 30 टक्क्यांनी कमी करू शकता.
डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सकाळच्या नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा आणि पोषण मिळतं. ओट्समध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वं आणि अनेक प्रकारचे पोषक असतात, ज्याचं सकाळी लवकर नाश्ता करून शरीराला अनेक फायदे मिळतात.
देशातील फिटनेस आणि वेलनेस ऑर्गनायझेशन एबलनुसार, ओट्स तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकतात. ओट्समध्ये सॉल्यूबल आणि इनसॉल्यूबल अशा दोन्ही प्रकारचे फायबर असतात जे आपल्या शरीराची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. विरघळणारे फायबर बीटा ग्लुकन शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि आजार दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
हार्ट यूके ही संस्था स्पष्ट करते की, जेव्हा ओट्समध्ये असलेले फायबर तुमच्या शरीरात जातात, तेव्हा ते जेलमध्ये बदलतात आणि आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉल-युक्त पित्त ऍसिड तयार करण्याचं कार्य करतं. यामुळे, तुमच्या यकृताला पित्त बनवण्यासाठी रक्तातून अधिक कोलेस्टेरॉल काढून टाकावं लागतं. परिणामी रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते.