मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी फळ खावे असे, तज्ज्ञ आपल्याला सांगतात. ज्यासाठी आपल्यापैकी प्रत्येतजण एक ना एक फळ नेहमीच खातात. त्यात केळं हे स्वस्त:त आणि कोणत्याही सिजनमध्ये मिळणारं फळ आहे. जे सर्वसाधारण लोकांना देखील परवडणारं आहे. परंतु रोज खात असलेलं केळं आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारक किंवा फायद्याचं आहे, हे तुम्हाला माहितीय?
जर तुम्हाला शरीरात कमजोरी असेल, तर तुम्ही केळी जरूर खावी, खरं तर केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. ते खाल्ल्याने पोट लवकर भरतं. ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यापूर्वी जर तुमचा सकाळचा नाश्ता चुकला असेल, तर केळी नक्की खा, कारण केळी खाल्ल्याने झटपट एनर्जी मिळते.
केळीचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या देखील दूर होतात. वास्तविक, केळीमध्ये असलेले स्टार्च तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.
केळीमध्ये ट्रायप्टोफॅन नावाचे तत्व आढळून येते. ट्रिप्टोफॅनमुळे आपल्या शरीरात सेरोटोनिन तयार होते. सेरोटोनिनला आनंदी संप्रेरक देखील म्हणतात. म्हणजेच यामुळे तुमचा ताण निघून जातो आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जातो.
हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी देखील दररोज रोज एक केळ खावे. वास्तविक, केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब सामान्य ठेवते.
मजबूत हाडांसाठी केळी खाणे खूप महत्वाचे आहे. यामध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे हाडांच्या विकासासाठी मदत करते.