मुंबई : वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता. पण या उन्हाळ्यात तुम्हाला वजन कमी करण्याची चांगली संधी आहे. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात वजन कमी करणे अधिक सोपे असते. कारण उन्हाळ्यात भूक मंदावते. त्यामुळे कमी खाल्ले जाते आणि भरपूर पाणी प्यायले जाते.
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरते. रिपोर्टनुसार, रोज नारळपाणी प्यायल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी कार्ब्सचे सेवन कमी करणे गरजेचे आहे.
थंडीच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अधिक गरज असते. नारळपाण्यातून ती भागवली जाते. त्याचबरोबर पचनक्षमता सुधारते आणि अॅसिडिटीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.