वजन कमी करायचंय...तर ओव्याचे पाणी प्या

सतत एक महिना ओव्याचे पाणी पिण्याने ३ ते ४ किलो वजन कमी होते. 

Updated: Mar 13, 2019, 04:56 PM IST
वजन कमी करायचंय...तर ओव्याचे पाणी प्या  title=

मुंबई : रोजच्या धावपळीच्या जीवनात लाइफस्टाईल अशी झाली आहे की अनेक जण ओव्हरवेटच्या समस्येने त्रस्त आहेत. व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. नोकरी करण्यासाठी अनेक तास घराबाहेर वेळ जातो. अशा वेळी इच्छा असूनही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊ शकत नाही. या संपूर्ण धावपळीच्या परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. ऑफिसमध्ये सतत एका जागी बसल्याने, व्यायामासाठी वेळ न दिल्याने शरीराची जाडी वाढते. वाढलेल्या जाडीमुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. परंतु या धावपळीच्या जगात यावर एक सोपा आणि घरगुती उपाय आहे. या उपायाच्या दररोज वापराने काही दिवसांतच तुम्हाला चांगले बदल जाणवू लागतील.

हा एक घरगुती उपाय आहे. प्रत्येकाच्या घरात ओवा असतो. पाण्यात ओवा टाकून तो रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते पाणी पिऊन टाका. हा प्रयोग सतत केल्याने यामुळे पोटाची चरबी कमी होईल. यात असणारे थायमोलमुळे पोटाची चरबी कमी होते. थायमोल मेटाबॉलिज्मला मजबूत करण्याचे काम करतो. ओव्याच्या पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते. अॅसिडीटीची समस्या दूर होते. या पाण्यात आयोडिन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियमदेखील असते. हे सर्व घटक शरीरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. 

ओव्याचे पाणी पिण्याने साखर आणि पोटासंबंधी आजार दूर होतात. अनेक जण गॅस आणि अस्थमा यांसारख्या समस्यांनी त्रस्त असतात. अशा लोकांनी ओव्याचे पाणी पिण्याने काही दिवसांतच चांगले परिणाम दिसू लागतील. ओव्याचे पाणी सतत एक महिन्यापर्यंत पिण्याने ३ ते ४ किलो वजन कमी होऊ शकते.