Blood sugar rise In Martahi: लहानपणापासून आपल्याला ऐक्याला मिळतं असतं, साखर किंवा गोड पदार्थ खाल्याने डायबिटिजचा धोका वाढतो. जगभरात मधुमेहाने ग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मधुमेह हा वृद्धापकाळाबरोबरच आता तरुणांनाही मधुमेहाची लागण होताना दिसते. साखर खाल्ल्याने मधुमेह होतो असा अनेकांचा समज आहे. पण या धारणेत किती तथ्य आहे हे जाणून घेऊया...
साखर हा आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आहारतज्ञांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वजण शक्य तितकी कमी साखर खाण्याचा सल्ला देतात. शुगर खल्ल्यास डायबेटीस होतो असंही म्हणतात. लोकांना वाटते की, साखर आरोग्यदायी नाही. याच्या अतिसेवनाने वजन वाढते. तसेच दात खराब होतात. मधुमेहामध्ये साखरेची पातळी वाढू शकते.
पण हे पूर्ण सत्य नाही. डायबिटीज स्ट्रेसमुळे होतो. डायबिटीज झाल्यानंतर साखर खाण्यास सक्त मनाई असते. पण साखर खाल्ल्याने कोणालाच डायबिटीज होत नाही, तो तणावामुळे होतो.
जास्त ताण हे अनेक आजारांचे मूळ कारण बनले आहे. मधुमेह यूकेच्या मते, काही पुरावे टाइप 2 मधुमेह आणि तणाव यांच्यातील संबंध सूचित करतात. उच्च पातळीचा ताण स्वादुपिंडायच्या इन्सुलिन-उत्तेजक-उत्पादक पेशींना कार्य करण्यापासून रोखू शकतो. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते परंतु केवळ तणावामुळे मधुमेह होऊ शकत नाही, हे देखील संस्थेचे मत नाही. तसेच तणावामुळे कोर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन हार्मोन्स वाढतात. त्यांची जास्त वाढ शरीरासाठी हानिकारक असते. यामुळे इन्सुलिन निकामी होऊ शकते ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. यामध्ये स्नायू ग्लुकोज वापरू शकत नाहीत आणि रक्तातील साखर वाढू लागते.
दरम्यान मधुमेहामुळेच ताण येऊ शकतो. यामध्ये रुग्णाला त्याच्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि त्याची जीवनशैली पूर्णपणे बदलावी लागेल. हे करणे सुरुवातीला आव्हानात्मक आणि तणावपूर्ण वाटू शकते. यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घ्या, आपले मन इतरांसमोर मोकळे करा, तुम्हाला आनंद घेणाऱ्या गोष्टी करत राहा, व्यायाम सुरु ठेवा, सकस आहार घेण्याच डॉक्टर सल्ला देत असतात.
तुम्ही जर साखर पूर्णपणे बंद करून फळे, सुका मेवा यासारखे गोड पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पुर्णपणे गोड पदार्थ सोडणं तुमच्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे तुमच्या शरीरातील चरबीपासून ग्लुकोज तयार करण्यासाठी आवश्यक घटकांची कमतरता आहे. यामुळे शरीरात केटोन्स तयार होऊ लागतात. हे कीटोन्स तुमची चरबी जाळतात, मात्र अशा प्रकारे फॅट कमी केल्यास तुमच्या मसल्समध्ये दुखण्यास सुरूवात होते. एकंदरीत, साखर सोडल्यामुळे तुम्हाला फायदाच आहे. पण पूर्णपणे गोड पदार्थ सोडल्यामुळे तुमचं नुकसानच होऊ शकतं.