शरीराच्या या समस्या देतात गंभीर आजारांचे संकेत!

 तुम्हाला यापैकी कोणत्या समस्या आढळतात का? 

Updated: May 11, 2018, 01:57 PM IST
शरीराच्या या समस्या देतात गंभीर आजारांचे संकेत! title=

मुंबई : शरीरातील काही समस्या, त्रास आपल्याला शरीरातील कमतरतेची लक्षणे असतात तर काही मोठ्या गंभीर आजारांचा इशारा देतात. तुम्हाला यापैकी कोणत्या समस्या आढळतात का? मग त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पहा कोणत्या समस्या शरीराविषयी काय सांगतात ते....

#1. कंबरेजवळ चरबी सुटत असल्यास हे मधुमेहाचे लक्षण आहे. महिलांची कंबर ३४ इंच आणि पुरुषांची कंबर ४० इंचापेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. अधिक वजन मधुमेहाला निमंत्रण देते.

#2. डोळ्यांजवळील डार्क सर्कल्स अपुऱ्या झोपेचे लक्षण आहे किंवा एखादी एलर्जीही असू शकते.

#3. पायांच्या बोटांच्यामध्ये सफेद चट्टे येत असतील किंवा कट्स गेले असतील तर पायांच्या स्वच्छतेची अधिक काळजी घ्या.

#4. ओठांच्या कडा फाटत असतील तर शरीरात व्हिटॉमिन बी ची कमतरता आहे.

#5. केसगळतीचे प्रमाण वाढत असल्यास शरीरात आयर्नची कमतरता असल्याचे समजावे.

#6. नखं खूप तुटत असल्यास फंगल इंफेक्शन किंवा थायरॉईडचा त्रास असू शकतो.

#7. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास शरीरात पाणी आणि फायबर्सची कमतरता आढळते.