Seeds Water For Uric Acid: युरिक अॅसिडची समस्या आजकाल सामान्य बनली आहे. युरिक अॅसिडमुळं सांधेदुखी, सूज येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.शरीरात युरिक अॅसिड वाढण्याची अनेक कारणे आहेत. जेव्हा युरिक अॅसिड खूप जास्त प्रमाणात वाढते तेव्हा आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. युरिक अॅसिड कसे नियंत्रणात ठेवायचे, तसंच, युरिक अॅसिड कमी कसे करायचे यासाठी अनेक उपाय शोधत असतात. युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पदार्थांची मदत तुम्ही घेऊ शकता. युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठीचे काही घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
युरिक अॅसिड हे एक प्रकारचे केमिकल आहे. जे शरीरातील प्युरिनचे विघटन झाल्यामुळं बनते. प्युरिन हे सामान्यतः पदार्थांमध्ये आढळले जाते. शरीरातील एनर्जी मिळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मात्र, जेव्हा शरीरात युरिक अॅसिड जास्त होते आणि ते रक्तात जमा व्हायला लागते तेव्हा सांधदुखी, सांध्यांमध्ये सूज व लालसरपणा सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
आळशीच्या बिया
आळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर सारखे गुणधर्म असतात. जे सूज कमी करण्यास मदत करतात. युरिक अॅसिडची वाढलेली मात्रा नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात.
चिया सिड्स
चिया सिड्समध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबरची मात्रा जास्त असते. हे बिया शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात आणि युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
एक चमचा आळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा
सकाळी उपाशी पोटी हे पाणी गाळून प्या.
तुम्ही आळशीच्या बिया मिक्सरमधून बारीक करुन त्याची पावडरदेखील करु शकता. ही पावडर कोमट पाण्यात टाकून त्याचे सेवन करु शकता.
एक चमचा चिया सिड्स रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा
सकाळी उपाशी पोटी हे पाणी गाळून प्या.
तुम्ही चिया सिड्स स्मूदी, सलाड किंवा योगर्टमध्ये टाकूनही पिऊ शकतात.
सूज कमी करतात: आळशी आणि चिया सिड्समध्ये असलेल्या अँटी इफ्लेमेंटरी गुण असतात. त्यामुळं सांधेदुखी व सांध्याची सूज कमी करण्यास मदत करते.
डिटॉक्सिफिकेशन- या बिया शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करतात. त्यामुळं युरिक अॅसिड नियंत्रणात राहते.
पचनसंस्था सुधारते- या बियांमध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर बद्धकोष्ठताच्या समस्यांवरही रामबाण उपाय आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)