मुंबई : आपण आपल्या खाण्यात नेहमीच फळांचा समावेश करतो. फळं खाणं आपल्या शरीरासाठी देखील महत्वाचं आहे. परंतु फळ ठेवताना आपण बऱ्याचदा नकळत एक चुक करतो. ती म्हणजे आपण केळींना इतर फळांसोबत ठेवतो. परंतु विज्ञानाच्या दृष्टिकोनातुन पाहिलं तर असं करणं योग्य नाही. विज्ञानात सांगितले आहे की, इथेन गॅस केळीपासून मिळतो. हा गॅस स्वयंपाकासाठी वापरतात. याच कारणामुळे केळी झाडावरुन काढल्यानंतर देखील पिकतात.
तर आता हे जाणून घ्या की या वायूचा आणि केळीचा इतर फळांवर काय परिणाम होतो?
केळीतून बाहेर पडणारा वायूमुळे केळी पिकते. अशा परिस्थितीत केळीमध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते, त्यामुळे त्यात गोडवा वाढतो आणि काही दिवसांनी ते अधिक पिकते. ते मऊ होऊ लागते. त्याच्या आजूबाजूला इतर फळे ठेवली की, ते ही पिकायला लागतात. कारण केळीमधील वायुचा त्यावर परिणाम होतो.
आता प्रश्न असा आहे की, केळीभोवती ठेवलेली सर्व फळे पिकायला लागतात की नाही? केळीसोबत ठेवलेल्या बहुतांश फळांवर त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ, सफरचंद पिकलेल्या केळ्यांसोबत ठेवल्यानंतर काही तासांनंतर ते पिकलेले दिसतात आणि ते मऊ होतात त्याच वेळी, संत्री, लिंबू आणि बेरी ही अशी फळे आहेत ज्यांना इथेन गॅसचा प्रभाव पडत नाही.
आता त्याचे विज्ञान देखील समजून घ्या. केळीवर संशोधन करणारे एक्सेटर विद्यापीठातील संशोधक डॉ. डॅन बीबर म्हणतात की सफरचंद, बटाटे, एवोकॅडोसारख्या इतर फळांच्या तुलनेत केळी फार लवकर तपकिरी दिसू लागतात. याचे कारण त्यात असलेले एक एन्झाइम आहे.
डॉ डॅन बीबर म्हणतात, केळीमध्ये पॉलीफेनॉल ऑक्सिडेज एन्झाइम आढळते. हे एन्झाइम केळीमध्ये असलेल्या फिनोलिक रसायनाचे ऑक्सिजनच्या मदतीने क्विनोनमध्ये रूपांतर करते. ऑक्सिजनच्या प्रतिक्रियेनंतर या रसायनाच्या प्रभावामुळे केळी तपकिरी दिसू लागतात.