Chia Seeds Benefits: आपल्या आरोग्यासाठी आपण कायमच नव्या उपायांचा मार्ग अवलंबवत असतो. अनेकदा आपण खातो त्या पदार्थांचा वापर आपल्या शरीरासाठी कसा फायदेशीर असतात याची कल्पनाही आपल्याला नसते आता अशाच एका पदार्थाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चिया बिया महिलांसाठी एक सुपर फूड आहेत. चिया बियांमध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. महिलांसाठी याचे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. (health benefits chia seeds for weight loss chia seeds women health)
केस मजबूत होतील (Chia Seeds For Hair)
महिलांच्या केसांसाठी चिया बिया रामबाण औषधापेक्षा कमी नाहीत. चिया सीड्स आहारात असल्यास केसांची वाढ तर होतेच, याशिवाय केस तुटणे आणि गळणेही थांबते. कारण चिया बियांमध्ये आढळणारा फॉस्फरस मुळांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना मजबूत करतो. म्हणूनच महिलांनी चिया बियांचे सेवन करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
चेहऱ्याची चमक वाढवा (Chia Seeds for Skin)
चिया बियांचे सेवन करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर चमक येते. होय, ते खाल्ल्याने त्वचा हायड्रेट राहते. यामध्ये आढळणारे प्रोटीन त्वचेचे नुकसान दुरुस्त करते आणि तुम्हाला तरुण आणि सुंदर बनवते.
वजन कमी करण्यास मदत (Chia Seeds for Weight Loss)
चिया बियांचे सेवन केल्याने वजन वाढत नाही आणि लठ्ठपणाही होत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आहारात चिया बियांचा समावेश करू शकता.आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही याचे रोज सेवन केले तर त्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. यासोबतच तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीची समस्याही होत नाही.
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त (Chia Seeds For Blood sugar)
चिया बियांचे सेवन करणाऱ्या महिलांना मधुमेहाचा त्रास होत नाही. दुसरीकडे, जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर ते अन्न खाल्ल्यानंतर भिजवलेल्या चिया बियांचे सेवन करू शकतात.