रसगुल्ला खाण्याचे आरोग्यदायी फायदे

गोडाचे पदार्थ हे अनेकांचा विकनेस असतो. 

Updated: Jul 24, 2018, 03:26 PM IST
रसगुल्ला खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई : गोडाचे पदार्थ हे अनेकांचा विकनेस असतो. अति गोड खाल्ल्याने वजन वाढण्यासोबत अनेक आजारांचा धोका बळावण्याची शक्यता असते. रसगुल्ला हा देखील अशाच गोड पदार्थांपैकी एक! पश्चिम बंगालमधील ही मिठाई महाराष्ट्रातही चवीने खाल्ली जाते. पण केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीदेखील रसगुल्ला फायदेशीर आहे. 

रसगुल्ला आरोग्यदायी -  

रसगुल्ल्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लॅक्टोअ‍ॅसिड आणि केसिन घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रसगुल्ला केवळ स्वादिष्ट नव्हे तर आरोग्यालाही फायदेशीर आहे. 

रसगुल्ल्याचे आरोग्यदायी फायदे - 

काविळच्या रूग्णांसाठी रसगुल्ला फायदेशीर आहे. रोज पांढरे रसगुल्ले खाल्याने काविळीचा त्रास लवकर कमी होण्यास मदत होते. 

युरिन इंफेक्शनचा त्रास कमी करण्यासाठी रसगुल्ला सकाळ - संध्याकाळ खाणं आरोग्यदायी आहे. 

डोळ्यात जळजळ होत असल्यास रसगुल्ला खाणं फायदेशीर ठरू शकते. हा त्रास समूळ नष्ट करायला मदत होऊ शकते. 

तुम्हांला थकवा जाणवत असल्यास रसगुल्ला खाऊन तुम्हांला तात्काळ रिफ्रेश वाटू शकत. 

रसगुल्ला हा दूधापासून तयार केला जातो. त्यामुळे दूधातील कॅल्शियम घटक शरीरात हाडांना मजाबुती देण्यासाठी फायदेशीर ठरते.