Health Tips : तुम्ही सालीसकट बदाम खाता मग थांबा, नाहीतर...

Almond : बदाम खाणे हे आरोग्यासाठी खूप चांगलं (Beneficial for health) आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते हे आपण लहानपणापासून ऐकतं आलो आहोत. पण बदाम खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Dec 20, 2022, 07:09 AM IST
Health Tips : तुम्ही सालीसकट बदाम खाता मग थांबा, नाहीतर... title=
Health Tips Almond Benifits shall we eat soaked almonds and proper method of eating almonds nmp

Almond Benifits : आरोग्यतज्ज्ञ असो किंवा आयुर्वेदात असो प्रत्येक जण आपल्याला सुका मेवा खाण्यावर भर देण्यास सांगतात. अगदी वजन कमी (Weight Loss) करायचं असेल तर डाएटमध्ये सकाळी उठल्यावर सुका मेवाने सुरुवात करावी असं सांगितलं आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो. पण कोणत्याही सुकामेव्याबद्दल जेवढं कनफ्युजन नसेल तेवढं बदाम (Almond) बद्दल आहे. बदाम किती खावे, बदाम भिजवून खावेत की तसेच खायचे किंवा सालीसकट खायचे की साल काढून...असे अनेक प्रश्न अनेकांसमोर असतात. आज आपण त्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...

बदाम सालीसकट खायचा की नाही? (proper method of eating almonds)

बदामांमध्ये प्रथिने (protein), फायबर (fiber), व्हिटामिन ई (Vitamin E), कॅल्शियम (Calcium), या सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण बदाम सालीसकट खायचं की नाही याबद्दल अनेक लोकांमध्ये दुमत दिसून येतं. बदामाच्या सालीमध्ये टॅनीन (Tannin) नावाचा घटक असतो. टॅनीनमुळे बदामात असणारी उपयुक्त पोषकघटक शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होतो. सालीसकट बदाम खाल्ल्यास शरीराला काही फायदा होत नाही.त्याशिवाय बदामाचे साल पचायला खूप जड असतं. त्यामुळे जर तुम्ही सालीसकट बदाम खात असाल तर असं करू नका. कारण बदामापासून होणारे फायदे तुमच्या शरीराला मिळणार नाही. 

 

हेसुद्धा वाचा - Weight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या

 

बदाम भिजवून का खावेत (shall we eat soaked almonds)

आता दुसरी गोष्टी बदाम खाण्याची योग्य पद्धत काय. तर बदाम कायम भिजवलेले खावे. बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात आणि त्याची साल काढण्यास सोपं जातं. रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. जर फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियम,झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, कायम भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. 

 

हेसुद्धा वाचा - Morning Tips : तुम्ही ब्रश करण्यापूर्वी पाणी पिता मग आधी 'ही' बातमी वाचा

 

दिवसाला  किती बदाम खावेत? (How many almonds to eat a day)

रात्री 5 बदाम भिजवून (Soak almonds) ते सकाळी उठून साल काढून खावेत. नियमित प्रकारे असं केल्यास आपल्याला उर्जा मिळते. एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत, यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते. 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.) 

Health Tips Almond Benifits shall we eat soaked almonds and proper