Health Tips: किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'हे' पेय प्या

किडनीला निरोगी ठेवायचंय, आजपासून दररोज सुरु करा 'हे' पेय 

Updated: Jul 31, 2022, 03:41 PM IST
Health Tips: किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'हे' पेय प्या  title=

मुंबई : किडनी हा शरीराचा अविभाज्य भाग आहे, जो तुम्हाला शरीरातील घाण साफ करण्यास मदत करतो. तसेच रक्तातील घाण साफ करण्यासाठी हे गुणकारी आहे. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नसेल तर अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.त्यामुळे किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी या पेयाचे सेवन करा. चला जाणून घेऊयात ही पेय आहेत कोणती ती.  

मिंट लिंबूपाणी
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुदिना आणि लिंबूपासून तयार केलेले पेय सेवन केले जाऊ शकते. हे पेय तयार करण्यासाठी, एक ग्लास पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस, काही पुदिन्याची पाने आणि थोडी साखर घालून मिक्स करा. या पेयाच्या सेवनाने तुमची किडनी निरोगी राहते.

मसाला लिंबू सोडा
जर तुम्हाला थोडेसे मसालेदार खाण्याची आवड असेल तर मसाला लिंबू सोडा पेयेचे सेवन करा. यामुळे तुमची किडनी निरोगी राहते. हे पेय तयार करण्यासाठी, एक ग्लास घ्या. लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला आणि सोडा पाणी घालून चांगले मिक्स करा. आता हे तयार पेय प्या. याच्या मदतीने तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता.

नारळाची शिकंजी
किडनी निरोगी ठेवण्यासाठी नारळ शिंकजी पेय आरोग्यदायी असू शकते. हे पेय तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये नारळ पाणी घ्या. या पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.