High Cholesterol Symptoms in Eyes : आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणं (High Cholesterol) ही, गंभीर बाब मानली जाते. शरीरात जर वाईट कोलेस्ट्रॉलची (Bad Cholesterol) पातळी वाढली तर अनेक समस्या मागे लागण्याची शक्यता आहे. कोलेस्ट्रॉल हे आपल्या रक्तामध्ये मेणासारखा पदार्थ असतो. याच्या पातळीत वाढ झाली तर हृदयविकाराच्या झटक्याची (Heart Attack) शक्यता असते. यासाठी कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी आज आम्ही तुम्हाला डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांची माहिती देणार आहोत.
कोलेस्ट्रॉल हे चिटकून राहतं आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याची लक्षणं तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
डोळ्यांमध्ये दिसून येणारं पहिलं लक्षणं म्हणजे xanthelasma. या मध्ये तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळेपणा दिसून येतो. असं मानलं जातं की, ज्या व्यक्तींच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची लेवल अधिक असते, त्याच्या डोळ्यांजवळ अशा पिवळेपणा दिसून येतो. त्वचेच्या खाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने अशी परिस्थिती निर्माण होते.
या स्थितीमध्ये तुमच्या डोळ्यांच्या खाली निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे गोल कडे दिसून येतात. काहीवेळा हे गोल कडे कॉर्नियाच्या वरील बाजूला देखील येऊ शकतात. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.
ही सर्वात गंभीर परिस्थिती असून यामध्ये डोळ्यांच्या नसांमध्ये ब्लॉक होऊ लागतात. यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं लक्षण दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांची मदत घ्यावी. या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
LDL म्हणजेच तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतील. यामुळे बऱ्याच प्रमाणात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होचे. यासाठी तुम्हाला अधिक फायबर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. त्याचप्रमाणे आहारामध्ये ओट्स, संपूर्ण धान्य तसंच बार्ली यांचा समावेश केला पाहिजे. तर भाज्यामध्ये शेंगा, वांगी, भेंडी या भाज्या खाव्यात.