खाण्यापूर्वीच नकली अंड कसं ओळखाल ?

अंड्यापासून अनेक पदार्थ झटपट तयार होतात. 

Updated: Aug 14, 2018, 08:26 AM IST
खाण्यापूर्वीच नकली अंड कसं ओळखाल ? title=

मुंबई : अंड्यापासून अनेक पदार्थ झटपट तयार होतात. त्यामुळे अनेकांचा त्यापासून तयार होणार्‍या पदार्थांकडे अधिक कल असतो. बाजारात नकली अंडी मिसळून काही आर्थिक फायदा लुटण्याचा प्रयत्न असतो. परंतू तुम्ही काळजीपूर्वक अंड्याची निवड न केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.  

अंड विकत घेताना कोणती काळजी घ्याल?

अंडी घेतल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवा. 
अंडी अति तापमानामध्ये ठेवू नका. 
जेव्हा गरज असेल तेव्हाच अंड विकत घ्या. वाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?
अंड वापरण्यापूर्वी स्वच्छ धुणं गरजेचे आहे. त्यावर बॅक्टेरिया असतात. अस्वच्छ अंड्यांमुळे काही पचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे.

अंड असली की नकली कसं ओळखाल ? 

अंड असली की नकली हे खाण्यापूर्वीच ओळखायचं असेल तर ते पाण्यात टाका. जर अंड पाण्याच्या भांड्यात खाली  राहते. नकली अंड तरंगते. त्यामुळे अंड तपासल्याशिवाय खाण्याची चूक मूळीच करू नका. अंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांंचा आश्चर्यकारक खुलासा