रात्रीच कणिक मळून सकाळी पोळ्या लाटताय? तर आत्ताच सावध व्हा, कारण...

kitchen Tips In Marathi रात्रीच चपात्याचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवताय? थांबा तुम्ही ही चुकी करु नका. कारण यामुळं तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 6, 2023, 06:00 PM IST
रात्रीच कणिक मळून सकाळी पोळ्या लाटताय? तर आत्ताच सावध व्हा, कारण...  title=
kitchen tips in marathi kneaded dough that you keep in the fridge can become unhealthy

Kitchen Hacks In Marathi: सकाळी ऑफिसची गडबड आणि त्यात ऑफिस व शाळेचा डब्बा करायचं म्हटलं की खूप घाई होते. अशावेळी ऑफिसात जाणाऱ्या महिला रात्रीच कणकेचे पीठ मळून ठेवतात. जेणेकरुन सकाळी उठल्यावर लगेचच पोळ्या लाटून घेता येतील. अनेकांना यात काहीच वावगं वाटत नाही. पण रात्रीच मळून ठेवलेल्या पीठ हे आरोग्यासाठी फायदेशीर नसते असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. शिळी चपाती खाल्ल्याने जसं आरोग्यास हानिकारक ठरु शकते. तसंच रात्री मळून ठेवलेल्या कणकेच्या दुसऱ्या दिवशी चपात्या केल्यासही आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

शिळ्या चपात्या मधुमेहानी त्रस्त असलेल्या लोकांसाठी हानिकारक असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर पाचनसंस्थाही बिघडते. योग्य पद्धतीने शिळ्या चपात्या खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. म्हणजेच 12 ते 15 तासांच्या आत शिळ्या चपात्या खाऊ शकता. पण रात्रीच कणिक फ्रीजमध्ये ठेवणे का हानिकारक असतात हे जाणून घेऊया. 

- कणकेत आंबण्याची प्रक्रिया सामान्य पिठाच्या तुलनेत लवकर सुरू होते, ज्यामुळे पिठात बॅक्टेरिया वाढू लागतात. हे पीठ मानवी शरीरासाठी विषारी बनते आणि जर तुम्ही त्याचा रोज वापर केला तर ते तुमचे आरोग्य बिघडू शकते.

- ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना ते पचणे कठीण होते. शिळ्या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. त्यामुळे कधीही शिळ्या पिठापासून चपात्या बनवू नयेत. पीठ मळल्यावर लवकरात लवकर वापरावे.

- जर तुम्ही दररोज शिळ्या पिठाचा वापर करत असाल तर तुमची पचनसंस्था खराब होईल

- 12 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले शिळे अन्न खाल्ल्याने अतिसार, अन्न विषबाधा, ऍसिडिटी आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर काही वेळा शिळे अन्न पुन्हा गरम करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असेही सांगितले जाते.

जर तुम्ही अनेक दिवसांचे पीठ एकत्र मळले असेल तर जितक पीठ तुम्हाला नंतर वापरायचे आहे ते प्लास्टिकमध्ये गुंडाळा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)