Pain Releiving Yoga : ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करावं लागतं. त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. हालचाल न केल्यामुळे आणि खुर्चीवर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्यामुळे पाठ, मान आणि पाठदुखी होऊ शकते. कामाच्या धावपळीमध्ये व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. मात्र तुम्ही योगासनामधील फक्त ही 3 आसने केल्याने तुम्ही फिट राहू शकता.
भुजंगासन
सर्वप्रथम तुम्हाला पोटावर झोपावे लागेल.
आपले दोन्ही हात सरळ ठेवा आणि जमिनीवर ठेवा.
दीर्घ श्वास घेऊन तुमच्या शरीराचा वरचा भाग नाभीच्या वर उचला.
सर्व प्रथम, डोके मानेपासून वर उचला आणि नंतर हळूहळू संपूर्ण शरीर कंबरेपर्यंत उचलून वाकवा. या दरम्यान तुमचे स्नायू ताणले पाहिजेत.
काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर, श्वास सोडताना मागे झोपा.
धनुरासन
धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपावे.
गुडघे वाकवून पाय डोक्याच्या दिशेने आणा.
पायाची बोटे हाताने पकडा.
मान वर करून स्ट्रेच करा, या दरम्यान संपूर्ण कंबरेला ताण बसला पाहिजे.
अशा स्थितीमध्ये तुम्ही किमान 30 सेकंद तरी रहा.
मार्जारासन
मार्जारासन करताना शरीराचा भाग पुढच्या बाजूला वाकवून दोन्ही हात पुढे नेऊन उभे राहायचे असते. आसनादरम्यान शरीराचा भाग वरच्या आणि खालच्या बाजूला ढकलायचा असतो. हे 30-35 वेळा करावं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)