हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खा शेंगदाणे

जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या सतावत असतील वा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका असल्यास दररोज शेंगदाणे खाण्याची सवय लावा. पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून अशी बाब समोर आलीये की दररोज शेंगदाणे खाल्ल्याने हृद्य आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.

Updated: Sep 30, 2017, 10:56 PM IST
हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खा शेंगदाणे title=

मुंबई : जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या सतावत असतील वा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका असल्यास दररोज शेंगदाणे खाण्याची सवय लावा. पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून अशी बाब समोर आलीये की दररोज शेंगदाणे खाल्ल्याने हृद्य आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.

या युनिर्व्हसिटीतील संशोधनाकांनी केलेल्या रिसर्चमध्ये दररोज ८५ ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्याने हार्टअॅटॅक, हार्ट स्ट्रोकची जोखीम कमी होते. रक्तातील हानिकारक ब्लड फॅट कमी करण्यासाठी शेंगदाणे मदत करतो. 

खरतरं, रक्तातील हे हानिकारक फॅट्स हळूहळू धमन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे रक्ताच्या प्रवाहात अडचण निर्माण होऊ लागते. हळूहळू धमन्यांमधून होणारा रक्तप्रवाह बंद होऊ लागतो. ज्यामुळे हार्टअॅटॅक वा स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होतात. 

यामुळे शेंगदाणे धमन्यांचे कार्य सुरळीत राखण्यास मदत करतात. याशिवाय शेंगदाण्यात आढळणाऱ्या आर्जिनिन नामक अमिनो अॅसिड ब्लड प्रेशर सामान्य राखण्यास मदत करतात. यामुळे पोट आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.