जपानी तरुणींची त्वचा इतकी नितळ कशी? पहिल्यांदाच रहस्य समोर, तुम्हीही दहा वर्षे तरुण..!

यामध्ये विटामिन बी(vitamin B) असते जे पावरफूल अँटी ऑक्सीडेंट(Anti Oxidant) आहे.जे आपल्या त्वचेमधील कॉलेजेन(skin collagen) वाढवून सुरकुत्या हटवते...

Updated: Sep 7, 2022, 11:13 AM IST
 जपानी तरुणींची त्वचा इतकी नितळ कशी? पहिल्यांदाच रहस्य समोर, तुम्हीही दहा वर्षे तरुण..! title=

Secret of japanese beauty for youtufull skin : सुंदर दिसण  कोणाला आवडणार नाही .सुंदर दिसण्यासाठी आपण प्रत्येकजण खूप प्रयत्न करत असतो .पार्लर्समध्ये हजारो रुपये घालवले जातात ना ना तर्हेचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात पण बऱ्याचदा हवा तसा रिझल्ट  दिसत नाही आणि आपण निराश होतो.

 जपानी स्त्रियाची त्वचा खूप सुंदर तजेलदार आणि नितळ असते(pimple free flawless skin) त्यांच्यासारखी सुंदर स्किन सर्वाना हवीशी असते पण इतकी  सुंदर स्किन मिळवण्यासाठी जपानी स्त्रिया नेमकं काय करत असतील हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो

पण आत पहिल्यांदा जगासमोर जपानी स्त्रियांच्या सुंदरतेच रहस्य समोर आलं आहे . (Secret of japaniese beauty for clear pimple free skin )

आपली त्वचा खूप नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचं प्रमाण खूप वाढत जात . त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या (wrinkles)खास जपानची ही टेक्निक आता घरबसल्या तुम्ही आजमावू शकता .

तांदळाच्या पिठापासून बनवलेला  anti aging फेस मास्क (face mask)तुमच्या चेहऱ्यावर जादूप्रमाणे काम करेल . चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यामुळे तुमचा सुंदर असलेला चेहरा खराब दिसायला लागतो.

 जपान मध्ये तांदूळ हा घटक नैसर्गिक सौंदर्य उपचारांमध्ये अनेक वर्षांपासून वापरला जातो. त्यामध्ये विटामिन बी(vitamin B) असते जे पावरफूल अँटी ऑक्सीडेंट(Anti Oxidant) असते.

जे आपल्या त्वचेमधील कॉलेजेन(skin collagen) वाढवून सुरकुत्या हटवते. तांदळात असणाऱ्या खनीजांमुळे त्वचेतील सेल आणि टीश्यू चे संरक्षण होते आणि aging कमी होते. याशिवाय आपल्या त्वचेतील रक्ताभिसरण चांगले होऊन  त्वचा चमकु(glowing skin) लागते.

तीन चमचे तांदूळ(rice water face mask) एका बाऊलमध्ये घ्या. यात अर्धा लिटर पाणी घाला.मंद आचेवर हे मिश्रण उकळायला ठेवा. चमच्याने सलग ढवळत रहा. तांदूळ नीट शिजवून घ्या. मिक्सरमध्ये हा अर्धवट शिजलेला तांदूळ त्याच्या पाण्यासकट बारीक करून घ्या. एक पेस्ट बनवून घ्या. 

आणखी वाचा:वडिलांच्या एका अटीमुळे Amitabh Bachchan यांना करावं लागलं लग्न आणि रेखाऐवजी जया झाली अर्धांगिनी

या उपायामध्ये दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ओमेगा-3(omega 3) याने भरपूर असा जवस. तांदुळाप्रमाणेच जवस तीन चमचे अर्धा लिटर पाण्यात दहा मिनिट उकळून घ्या.थोडे थंड झाल्यावर वस्त्रगाळ करून घ्या. हे जेल तुम्ही साठवून ठेवा.

दोन चमचे तांदूळ पेस्ट आणि जवसाचे जेल प्रत्येकी, एक चमचा बदामाचे तेल हे सगळे नीट मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावरती तीस मिनिटे लावून ठेवा. शेवटी कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर गार पाण्याने. यानंतर चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाचे तेल लावा.