दिवसाची सुरूवात चटपटीत छोले-भटुरेंनी! ब्रेकफास्टसाठी एकदम गरमागरम झकास मेन्यु

दिवसाची सुरूवात मस्त गरमागरम टेस्टी ब्रेकफास्टने करायची इच्छा असेल तर, छोले भटुरे तुमच्यासाठी भारी पर्याय आहे.

Updated: Apr 16, 2021, 07:52 AM IST
दिवसाची सुरूवात चटपटीत छोले-भटुरेंनी! ब्रेकफास्टसाठी एकदम गरमागरम झकास मेन्यु title=

दिवसाची सुरूवात मस्त गरमागरम टेस्टी ब्रेकफास्टने करायची इच्छा असेल तर, छोले भटुरे तुमच्यासाठी भारी पर्याय आहे. सकाळी सकाळी टेस्टी आणि चटपटी भटूऱ्यांनी तुम्ही दिवसभर ताजे तावाने राहू शकाल.

  अमृतसरी छोले भटुरे पंजाबमधील स्ट्रीटफूड रेसिपी आहे. जे सकाळी नाश्ट्यासाठी बनवले जाते. बघुयात छोले भटुरे कसे बनवावे.

 साहित्य

 2 कप चने
 चहा पत्ती - गरम
 सुखलेला आवळा
 2 तेजपान
 2 दालचिनी स्टिक
 2 इलाइची
 1 चमचा जीरा
 2 काळी मिरी
 3 लवंग
 2 कांदे, बारीक कापलेले
 लसून 
 आले, अद्रक
 1 चमचा हळद
 1 चमचा तिखट
 1 चमचा धने
 3 चमचे मिठ
 1 कप पाणी
 1 टमाटे, बारीक कापलेले
 अर्धा चमचा साखर
 2 कप मैदा
 अर्धा कप गव्हाचे पीठ

छोले कसे बनवावे

 छोले बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांडे घ्या, त्यात छोल्यांसह चहा पत्ती आणि सुखलेला आवळा टाकून उकळून घ्या.  त्यानंतर एका कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यानंतर कढईत तेजपान, दालचीनी, जीरे, मोहरी आणि लवंग टाका. त्यानंतर कढईत कांदे टाका. त्याला मस्त गोल्डन रंग चढेपर्यंत तयार करा. आता त्यात लसून, अद्रक, हळद, तिखट, धने आणि मिठ टाकून मसाला मिश्रण करा. त्यानंतर पाणी घालून त्यात उकळलेले छोले आणि कापलेले टमाटे टाका. मसाला, पाणी आणि छोले व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण कुकरमध्ये काढून घ्या आणि त्याला थोडावेळ शिजवायला ठेवा.

 भटुरे कसे बनवाल?

 एका वाटीत यीस्ट घ्या आणि थोडी साखर आणि पाणी टाका. त्याचे चांगले मिश्रण करा. एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या. त्यात गव्हाचे पीठ, मिठ आणि यीस्ट मिश्रण करा.  या मिश्रणात गरजेनुसार पाणी घाला. त्याचे छान कनिक तयार करा. हे 2-3 तास ओल्या कपड्यात झाकून तसेच ठेवा.  त्यानंतर थोडे पीठ घेऊन त्याच्या रोट्या बनवा आणि गरम तेलात तळून घ्या.
 
 अशाप्रकारे तुमचे टेस्टी, चटपटीत छोले भटुरे तयार झाले.  मनसोक्त आनंद घ्या!