Healthy Diet: चुकीच्या आहाराच्या सवयींचा मुलाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
पुण्यातील बालरोगज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ अतुल पालवे यांच्या म्हणण्यानुसार, निरोगी खाण्याच्या सवयी पुढील आयुष्यात लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना प्रतिबंधित करतात. म्हणूनच मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी लावणे आवश्यक आहे.