तसे पाहाता किडनीचा आजार झालेल्या रुग्णांना त्याची लक्षणे लवकर जाणवत नाहीत.
मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक मानवी शरीरात दोन मूत्रपिंड म्हणजेच किडनी असतात, ज्या मुख्यतः आपल्या शरीरातील घटकांना फिल्टर करतात आणि नको असलेल्या गोष्टी आपल्या लघवीच्या वाटे बाहेर टाकतात. परंतु अनेक कारणांमुळे लोकांना किडनीसंबंधीत आजार उद्भवतात. ज्यामुळे कधीकधी छोटा ऑपरेशन तर कधी दुसरी किडनी बसवण्याची देखील वेळ येते. त्यामुळे किडनीच्या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करु नका. नाहीतर त्याचं रुपांतर गंभीर आजारात होऊ शकतो.
तसे पाहाता किडनीचा आजार झालेल्या रुग्णांना त्याची लक्षणे लवकर जाणवत नाहीत. त्यामुळे हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्हाला त्याची चाचणी घ्यावी लागेल. जर उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी निकामी झाल्याचा तुमचा कौटुंबिक इतिहास असेल तर, किडनीच्या आजारासाठी दरवर्षी चाचणी नक्की घ्या. तसेच अशी काह संभाव्य चिन्हे आहेत, जी सूचित करतात की तुम्हाला किडनीचा आजार असू शकतो.
तर आता ही लक्षणे कोणती आणि ती कशी ओळखायची हे जाणून घ्या
किडनीच्या कामात तीव्र घट झाल्यामुळे रक्तामध्ये विष आणि अशुद्धता तयार होऊ शकते. यामुळे लोकांना थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो आणि तसेच लक्ष केंद्रित करणे देखील कठीण होऊ शकते.
जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या फिल्टर करत नाहीत, तेव्हा विषारी पदार्थ रक्तात राहतात. यामुळे झोपणे कठीण होऊ शकते. लठ्ठपणा आणि किडनीचा जुनाट आजार यांच्यातील संबंध देखील आहे आणि सामान्य लोकांपेक्षा दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांमध्ये स्लीप एपनिया अधिक सामान्य आहे.
निरोगी किडनी अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करतात. ती तुमच्या शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकतात, लाल रक्तपेशी बनवण्यास मदत करतात, ज्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होतो आणि तुमच्या रक्तातील खनिजे योग्य प्रमाणात राखली जातात. जेव्हा किडनी आपल्या रक्तातील खनिजे आणि पोषक तत्वांचे योग्य संतुलन ठेवण्यास सक्षम नसतात. तेव्हा आपल्याला या समस्या उद्भवतात.
जर तुम्हाला जास्त वेळा लघवी करण्याची गरज वाटत असेल, विशेषत: रात्री, तर ही किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकतात. जेव्हा किडनीचे फिल्टर खराब होते, तेव्हा लघवी करण्याची इच्छा वाढते. काहीवेळा हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे किंवा पुरुषांमध्ये वाढलेले प्रोस्टेटचे लक्षण देखील असू शकते.
निरोगी किडनी सामान्यता रक्तातील कचरा लघवी वाटे बाहेर पाठवण्याचे काम करते, परंतु जेव्हा मूत्रपिंडाचे फिल्टर खराब होतात, तेव्हा या रक्तपेशी लघवीच्या वाटे बाहेर पडतात. परंतु लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकते. लघवीतील रक्त हे ट्यूमर, किडनी स्टोन किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते.
लघवीला आलेला फेस लघवीतील प्रथिने दर्शवतात. हा फेस आपण जेव्हा एखादं अंडी फेटवतो तसंच दिसतं, कारण अल्ब्युमिन, मूत्रात आढळणारे सामान्य प्रथिने, अंड्यांमध्ये आढळणारे प्रथिन आहे.
लघवीतील प्रथिने किडनीचे फिल्टर खराब झाल्याचे प्रारंभिक लक्षण आहे, ज्यामुळे प्रथिने लघवीमुळे बाहेर नुघून जातात. तुमच्या डोळ्यांभोवती हा फुगवटा या वस्तुस्थितीमुळे असू शकतो की, तुमचे मूत्रपिंड प्रथिने शरीरात ठेवण्याऐवजी मूत्रावाटे ते बाहेर टाकत आहे.
मूत्रपिंडाचे कार्य कमी झाल्यामुळे सोडियम टिकून राहते, ज्यामुळे तुमचे पाय आणि घोट्याला सूज येऊ शकते. घोट्यांमध्ये सूज येणे हे हृदयविकार, यकृताचे आजार आणि पायांच्या रक्तवाहिनीच्या दीर्घकालीन समस्यांचेही लक्षण असू शकते.
हे एक अतिशय सामान्य लक्षण आहे, परंतु किडनीचे कार्य कमी होण्यामागे विषारी पदार्थांचे प्रमाण वाढणे हे देखील एक कारण असू शकते.