Weight Loss Tips: दिवाळीत वजन वाढण्याची भिती वाटतेय, 'या' गोष्टींची काळजी घ्या

Weight Loss Tips: भरमसाठ फराळ खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची चिंता सतावतेय, आहारात 'या' गोष्टीचा समावेश करा 

Updated: Oct 22, 2022, 10:41 PM IST
Weight Loss Tips: दिवाळीत वजन वाढण्याची भिती वाटतेय, 'या' गोष्टींची काळजी घ्या title=

मुंबई : दिवाळीनिमित्त (Diwali 2022) अनेकजण गोड-धोड खातात. तेलकट, तुपकट आणि फराळ खाऊन दिवस काढणारे देखील आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर अनेकांना वजन वाढवण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे अचानक वजन वाढल्यावर (Weight Loss) ते कमी कस करायचा असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र दिवाळीनंतर तुमचं वजन वाढू नये यासाठी आम्ही काही गोष्टी सांगत आहोत. या गोष्टींची काळजी घ्या. तुमचं वजन नियंत्रणात राहील.  

मेथीचे पाणी 

दिवाळी (Diwali 2022) किंवा कोणत्याही दिवशी वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे लठ्ठपणा (Weight Loss Tips) कमी होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होते आणि चयापचय गतिमान होते. मेथीचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

व्यायाम सुरुच ठेवा 

सणासुदीत लोक सर्वात जास्त गोड-धोड अथवा चवीचे पदार्थ खातात. त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत चालणे किंवा व्यायाम अजिबात सोडू नका. याच्या मदतीने तुम्ही एका दिवसात जितक्या कॅलरी घेत आहात तितक्या कॅलरीज बर्न करू शकता. अशा प्रकारे मिठाई खाल्ल्यानंतरही तुमचे वजन नियंत्रणात राहील.

गरम पाणी

मिठाईशिवाय दिवाळी (Diwali 2022) अपूर्ण आहे. सणासुदीत गोड किंवा तेलकट पदार्थ जास्त खाल्ले जातात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही असा पदार्थ खात असाल तेव्हा त्यानंतर गरम पाणी जरूर प्या. त्यामुळे अन्न पचायला सोपे जाते आणि चरबीही वाढत नाही. 

ग्रीन टी 

जर तुम्ही जास्त चहा प्याल तर दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्या. दिवसातून 2-3 ग्रीन टी प्यायल्याने लठ्ठपणा (Weight Loss Tips) कमी होतो आणि चयापचय क्रिया चांगली राहते. यामुळे वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे सणासुदीला ग्रीन टी पिणे सोडू नका.

गोड खाण्यावर मर्यादा ठेवा  

दिवाळी (Diwali 2022)  वर्षातून एकदाच येते, असे म्हणत काही लोक खूप गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढते. म्हणूनच गोड खा, पण मर्यादित प्रमाणात. जर तुम्हाला मिठाई खायची असेल तर तुम्ही अंजीर बर्फी, ड्रायफ्रूट लाडू किंवा गुळापासून बनवलेल्या मिठाईसारखे नैसर्गिक गोड पदार्थ खाऊ शकता. तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. यामुळे लठ्ठपणा (Weight Loss Tips) वाढणार नाही.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)