Health News: गेल्या जवळपास 3 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी (Corona Virus) लढा देतंय. लॉकडाऊननंतर (Lockdown) आता कुठे लोकांचं जीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अशातच आता चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. असं मानलं जातंय की, यावेळी येणारा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही (Omicron variant) अधिक धोकादायक असू शकतो.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने थैमान घातलं होतं. कोरोनाच्या या व्हेरिएंटची अनेकांना लागण झाली होती. याशिवाय या व्हेरिएंटमुळे मृत्यूंचीही नोंद करण्यात आली होती. कोरोनासंदर्भात झालेल्या नव्या अभ्यासामधून काय समोर आलंय हे पाहूया.
दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या नव्या अभ्यासानुसार, कोरोना 19 च्या नमुन्यांचा वापर करून असं सांगण्यात आलंय की, हा व्हायरस विकसीत होऊन अधिक धोकादायक होतोय. या अभ्यासावरून असं लक्षात आलंय की, एक नवा व्हेरिएंट आहे जो कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक आहे.
दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिका इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्चमध्ये एलेक्स सिगल यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामधून असं लक्षात आलं की, कोरोना हा अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नाहीये. याचा अजून एक व्हेरिएंट समोर येणार आहे. शिवाय हा येणारा व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा धोकादायक असू शकतो. जगभरातील व्यक्तींच्या मृत्यूचं कारण हा व्हेरिएंट बनू शकतो.
दरम्यान या अभ्यासाचं अजून पुनरावलोकन करणं बाकी आहे. कारण हा अभ्यास केवळ एका व्यक्तीच्या नमुन्यावर आधारित आहे.
सीगल आणि इतर तज्ज्ञांनी असा अंदाज लावला होती की, HIV संक्रमित लोकांना आणि इम्यूनोसप्रेस्ड व्यक्तींमध्ये बीटा आणि ओमायक्रॉनसारख्या व्हेरिएंट विकसीत होऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लोकांना या संसर्गापासून बरं होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
तज्ज्ञांनी 24 नोव्हेंबर रोजी केलेल्या एका अभ्यासात म्हटलंय की, येणाऱ्या काळामध्ये हा नवा व्हेरिएंट अनेक लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लोकांनी यापासून सतर्क राहिलं पाहिजे.