आई आणि मुलीच्या नात्यात का येतो दुरावा, कसं कराल नातं घट्ट, वाचा

आयुष्यात अशा अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आई आणि मुलीमध्ये अंतर निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्यातही अंतर आले असेल तर तुम्ही या मार्गांनी तुमचे नाते पुन्हा घट्ट करू शकता.

Updated: Nov 11, 2022, 11:30 PM IST
आई आणि मुलीच्या नात्यात का येतो दुरावा, कसं कराल नातं घट्ट, वाचा title=
Why there is a gap in the relationship between mother and daughter how to strengthen the relationship nz

How to Improve Mother Daughter Relationship: जेव्हा एखाद्या घरात मुलीचा जन्म होतो तेव्हा तिची पहिली मैत्रिण ही तिची आई असते. आई आणि मुलीचे नातं हे अनोखे असते. एक आपल्या मुलीला पावलोपावली वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असते. कोणत्याही परिस्थितीत आई ही नेहमीच मुलीची ढाल म्हणून उभी राहते. मुलींनी सशक्त बनावं यसाठी आई जोखीम घेत असते. मुलींना स्वतःची सावली समजून घेणारी आईच आहे, जी तिला घराघरात स्थिरावण्यापासून अत्यंत कठीण प्रसंगात धीर देते. आयुष्यात अशा अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आई आणि मुलीमध्ये अंतर निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्यातही अंतर आले असेल तर तुम्ही या मार्गांनी तुमचे नाते पुन्हा घट्ट करू शकता. (Why there is a gap in the relationship between mother and daughter how to strengthen the relationship nz)

हे ही वाचा - पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी... जाणून घ्या एका क्लिकवर

आई आणि मुलीमधील अंतर दूर करण्याचे मार्ग

आईच्या गरजांची काळजी घ्या

आयुष्यभर मुलांना सुखी ठेवण्यासाठी तिनं त्याग केलेला असतो. मग अशावेळेस वयानुसार आईच्या गरजांची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करा, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लागल्या तर त्या बाजारातून आणा, तुम्हाला कोणाला भेटायचे असेल तर तिथे घेऊन जा. 

हे ही वाचा - ओ माँ, माताजी... दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन देणे 'या' अभिनेत्रीला पडले महागात... नेमकं झालं तरी काय?

विशेष प्रसंगी एकत्र राहा

कोणत्याही विशेष सणाला, तुम्ही तुमच्या आईला भेटण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असाल तर तुम्हाला व्हिडिओ कॉल किंवा कॉल करणे आवश्यक आहे. 

नियमितपणे बोला

आईला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही तिला नियमितपणे फोन करत राहणे आणि बोलत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. आईच्या आरोग्याविषयी काळजी घेणे व विचारपूस करणे हे देखील महत्त्वाचे आहे. तिच्या गरजा जाणून घ्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहा. असे केल्याने आईला एकटेपणा जाणवणार नाही आणि तुमच्यामध्ये चांगले नाते निर्माण होईल. 

हे ही वाचा - सपना चौधरीचा सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ, डान्सचा 'हा' Video झाला व्हायरल

वर्षातून एक सहल आवश्यक आहे

तुम्ही तुमच्या आईसोबत वर्षातून एक सहलीची योजना आखली पाहिजे. असे केल्याने तुम्ही तुमचे बालपण पुन्हा जगू शकाल आणि आईला उर्जेने भरलेले वाटेल.

माफ करायला शिका

जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल आईवर रागावत असाल तर तुम्ही तिच्याशी शांततेने बोलणे आणि त्यांच्यातील गैरसमज दूर करणे चांगले आहे. कधीकधी आपल्या खास व्यक्तीबद्दलचा आपला राग आपल्याला आयुष्यभर पश्चात्ताप करून सोडतो. त्यामुळे आईला प्रत्येक परिस्थितीत माफ करायला शिका.

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)