सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक

Schizophrenia Symotoms and Treatments: स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णाच्या शरीरात चित्र विचित्र बदल पाहायला मिळतात. अनेकांना हे भूत-प्रेताने झपाटले तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण हा एक आजार आहे. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 24 मे रोजी 'जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस' साजरा केला जातो. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 24, 2024, 11:03 AM IST
सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक title=

World Schizophrenia Day : स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णाच्या शरीरात चित्र विचित्र बदल पाहायला मिळतात. अनेकांना हे भूत-प्रेताने झपाटले तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण हा एक आजार आहे. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 24 मे रोजी 'जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस' साजरा केला जातो. 

'जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस' 24 मे रोजी आहे. हा दिवस साजरा करण्यामागचं उद्देश आहे की, आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होणे. स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार असून हा गंभीर म्हणून ओळखला जातो. स्किझोफ्रेनियाचा रुग्ण कायम एका प्रकारच्या भ्रमात असतात. ही स्थिती पुरुष-महिला या दोघांसाठीही गंभीर असते. अनेक लोक या आजाराला स्प्लिट पर्सनॅलिटी समजतात. हा एक प्रकारचा डिसऑर्डर आहे. 

स्किझोफ्रेनियाची सुरुवातीची लक्षणे 

या आजाराची लक्षणे सामान्यपणे किशोरावस्थेत म्हणजेच 20 व्या वर्षी दिसू लागतात. कुटूंब आणि मित्र परिवारापासून स्वतःला वेगळ ठेवणं, सतत मित्र किंवा सोशल ग्रुप बदलत राहणे, कोणत्याही गोष्टीवर फोकस न करणे, चिडचिडेपणा, अभ्यासात लक्ष नसणे यासारखी प्रमुख लक्षणे या आजारात दिसतात. 

स्किझोफ्रेनियामध्ये रुग्ण एका काल्पनिक जगात राहत असतात. वास्तविक आपण जगापासून वेगळे आहोत असा विचार केला जातो. यामुळे त्यांच्या भावना, व्यवहार आणि क्षमतेत बदल पाहायला मिळतो. या आजाराचे रुग्ण आपल्या भावना योग्य प्रकारे मांडू शकत नाही. त्यांना भावना, विचार व्यक्त करण्यास अडथळा येतो. एवढंच नव्हे तर जगण्याचा रस देखील तितकाच कमी होऊन जातो. एवढंच नव्हे तर कोणत्याही गोष्टीबाबत हे लोक अतिशय भावूक होतात. 

स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना अनेकदा अशा गोष्टी दिसतात किंवा त्याचा भास होतो ज्या खरंच दिसतही नाहीत. पण त्यांना या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. एवढंच नव्हे तर अनेक गोष्टी त्यांना जाणवू लागतात किंवा त्याचा स्वाद, गंधही अनुभवता येतो. एवढंच नव्हे तर स्किझोफ्रेनियाचे रुग्ण अनेक प्रकारचे समज देखील करुन घेतात. जसे की, आपल्याला कुणी त्रास देतोय? तसेच एखादी दैवी शक्ती असल्याची भीती. स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे. ज्यामध्ये रुग्णांना विचित्र भ्रम होतात. 

स्क्रिझोफ्रेनियाची कारणे 

सामान्यपणे ही लक्षणे ओळखणे कठीण होऊन जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा आजार कशामुळेही होऊ शकतो. बायोलॉजिकल, जेनेटिक अशी या आजाराची स्थिती असते. काही अभ्यासांमधून स्किझोफ्रेनिया या आजाराचे कारण हे मेंदूतील संरचनेद्वारे दिसू लागतात. मेंदूतील हे बिघाड अशा आजारांना जन्म देतात. 

स्किझोफ्रेनिया आजारावर उपाय 

स्किझोफ्रेनिया या आजारावर थेट असा उपाय नाही. या आजारावर उपाय आयुष्यभर सुरुच असतो. ज्यामुळे लक्षणे कमी होऊ शकतात. पण हा आजार पूर्णपणे बरा होत नाही.