मुंबई : यूट्यूबने गुरुवारी एक मोठं पाऊल उचललं आहे. YouTube आता गर्भपाताबद्दलटे खोटे दावे असलेले व्हिडिओ काढून टाकण्यास सुरुवात करणार आहे. शिवाय गर्भपाताबद्दल वैद्यकीय प्रक्रियेबद्दल कोणतीही चुकीची माहिती असल्यास त्यावर कारवाई केली जाऊ शकते.
युनायटेड स्टेट्समधील अनेक प्रदेशांमध्ये गर्भपात अधिकार रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्त्रिया गर्भधारणेची विश्वसनीय माहिती ऑनलाइन शोधतात, त्यावरून हे पाऊल YouTube ने पाऊल उचललंय.
या निर्णयानुसार आता युट्यूब गर्भपातासंदर्भात चुकीची माहिती डिलीट करणार आहे. अनेकजण गर्भपातासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी युट्यूबची मदत घेत असल्याचं निदर्शनास आलं. या चुकीच्या माहितीमुळे महिलांचं आरोग्य धोक्यात आल्याने आता युट्यूब अशी धोकादायक माहिती देणारे व्हिडीओ डिलीट करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
यूट्यूबच्या प्रवक्त्या एलेना हर्नांडेझ यांनी CNN द्वारे उद्धृत निवेदनात म्हटलंय की, "आम्हाला विश्वास आहे की लोकांना आरोग्य विषयांबद्दल अधिकृत स्त्रोतांकडून येणाऱ्या माहितीशी जोडणं महत्वाचं आहे.
एलेना पुढे म्हणाल्या, "यासाठी आजपासून आणि पुढील काही आठवड्यांपासून, आम्ही आमच्या वैद्यकीय चुकीच्या माहिती धोरणांतर्गत असुरक्षित गर्भपात पद्धतींसाठी सूचना देणारा किंवा गर्भपाताच्या सुरक्षिततेबद्दल खोट्या दाव्यांना प्रोत्साहन देणारी सर्व सामग्री काढून टाकू."
YouTube ने सांगितलं की, ते अशा सर्व व्हिडिओंना जागतिक स्तरावर आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकणार आहे, ज्यामध्ये असुरक्षित गर्भपात आणि खोटे दावे यावरील सूचनांचा समावेश आहे.