श्रीनगर : शोपियाँमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. या दोनपैकी एका जवानाचा मृतदेह सापडलाय तर दुस-या दहशतवाद्याच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या कारवाईत भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचं नाव आदिल असं असून तो शोपियाँ इथला राहणारा असल्याचे सांगितलं जातं आहे. आदिलकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी आहेत. सध्या शोपियाँमध्ये चकमक थांबली असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.