आधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

 आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card) जन्मतारखेचा (Birth Certificate) वैध पुरावा नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने  दिला आहे.  

Updated: Aug 13, 2021, 01:34 PM IST
 आधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल title=

मुंबई : आता एक महत्वाची बातमी. आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card) जन्मतारखेचा (Birth Certificate) वैध पुरावा नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) दिला आहे. शाळेच्या दाखल्यावरची जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल, असे आपल्या निकालात म्हटले आहे. (Aadhar card, PAN card is not proof of date of birth; Significant Allahabad High Court Judgment)

आधारकार्ड पॅनकार्डच्या माध्यमातून जन्मतारखेचा दाखला ग्राह्य धरता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. वय ठरवण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाऊ शकते, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मेरठमधील एका सुनावणीत न्यायमूर्ती रोहित राजन अग्रवाल यांनी हा निकाल दिला. 

एका दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निकाल दिला आहे. लग्नासंदर्भातील या याचिकेमध्ये अर्जदारांनी 28 फेब्रुवारी 2021 रोजी आपण सज्ञान होतो, त्यामुळेच न्यायालयाने आमचा जगण्याचा आणि खासगी स्वांत्र्याच्या हक्कांचं संरक्षण करावे, अशी मागणी केली. तसेच इतर कोणीही आमच्या खासगी वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

दरम्यान, संबंधित मुलीच्या आईने न्यायालयासमोर दिलेल्या जबाबामध्ये शाळेच्या दाखल्यावरील तारीख योग्य असल्याचा आधार घेत न्यायालयाने शाळेच्या दाखल्यावरील तारीख बरोबर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आधारकार्डवरील किंवा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालाला प्राधान्य देता येणार नाही. 2019 मधील एका निकालाच्या आधारे आधार कार्ड हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचे न्यायालायने स्पष्ट केले.