नोटाबंदीनंतर ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची नजर - मोदी

देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये चार्टर्ड अकाऊंटंटशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी गुड अँड सिंपल टॅक्स अशा शब्दांत जीएसटीचं वर्णन केलं.

Updated: Jul 1, 2017, 07:59 PM IST
नोटाबंदीनंतर ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची नजर - मोदी title=

नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये चार्टर्ड अकाऊंटंटशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी गुड अँड सिंपल टॅक्स अशा शब्दांत जीएसटीचं वर्णन केलं.

सीए यांचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. सीए देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असं मोदी म्हणाले. 

आपलं सरकार सत्तेत आल्यापासून स्विस बँकेतल्या भारतीय ठेवीत घट झाल्याचं मोदी म्हणाले. सोबतच निश्चलिकरणाचा निर्णय, देशासाठी हितकारक ठरल्याचंही त्यांनी सांगितलं.

देशातल्या ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची करडी नजर असल्याचं ते म्हणाले. आर्थिक घोटाळेबाजांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.