बॅडन्यूज, पीपीएफ, अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात

सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 1, 2017, 05:25 PM IST
बॅडन्यूज,  पीपीएफ, अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात title=

नवी दिल्ली : सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केलीय. 

यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी आणि किसान विकास पत्र यांच्यावरील व्याजदर खाली आलेत. हे व्याजदर ०.१० टक्के इतके खाली आलेत. 

आता पीपीएफ आणि एनएससीवर ७.९ टक्क्यांऐवजी ७.८ टक्के व्याज मिळेल. किसान विकास पत्रवर ७.६ टक्क्यांऐवजी ७.५ टक्के व्याज मिळेल. 

याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना यांचेही व्याजदर खाली आलेत. या दोन्ही योजनांवर ८.४ टक्क्यांऐवजी ८.३ टक्के व्याज मिळणार आहे.