रामराजे शिंदे, प्रतिनिधी, झी मीडिया, नवी दिल्ली : काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली अशा चर्चा होत्या. या चर्चा राणेंनी फेटाळून लावल्या होत्या. यानंतर आता खुद्द अमित शहांनीच या चर्चांवर भाष्य केलं आहे.
नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एअरपोर्टवर भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी राणेंना गाडीतून सोडलं पण मला भेटायला फक्त मुख्यमंत्री आले. भाजपमध्ये यायला अनेक जण इच्छूक असल्याचं सूचक वक्तव्यही अमित शहांनी राणेंच्या भाजप प्रवेशावर केलं.