'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज

Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष...   

सायली पाटील | Updated: Jun 14, 2024, 12:39 PM IST
'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज title=
asi prepares for upcoming excavations in delhis purana qila to find mahabharata roots

Mahabharata : भारतामध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक ग्रंथ आणि त्या अवतीभोवती फिरणारे अनेक संदर्भ सातत्यानं पाहायला मिळतात. अशा या ग्रंथ आणि महाकाव्यांच्या यादीत येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे महाभारत. हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, कौरव, पांडव या आणि अशा अनेक संज्ञा या महाभारताच्या निमित्तानं आपल्या लिहिण्यावाचण्यात आल्या. आता याच महाभारताशी संबंधित काही अवशेष जगासमोर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे दिल्लीमध्ये येत्या काळात होणारं आणि याआधीही झालेलं उत्खनन. 

दिल्लीतील पुराना किला भागात करण्यात आलेल्या उत्खननामधून मातीच्या वस्तूंचे अवशेष सापडले. पुरातत्वं विभागाच्या माहितीनुसार या अवशेषांशी संबंधित माहिती पाहिली असता ती महाभारत काळातील असल्याचं सांगण्यात आलं. 

भारतीय पुरातत्वं विभाग येत्या काळात दिल्लीच्या पुराना किला परिसरामध्ये उत्खननाच्या सातव्या फेरीची सुरुवात केली जाणार आहे. अनेक दाव्यांनुसार याच भागाच इंद्रप्रस्थाचा भाग होता असं म्हटलं जातं. या उत्खननातून दिल्लीशी संबंधित अनेक पुरातन आणि ऐतिहासिक संदर्भ प्रकाशात येणार आहेत. 

हेसुद्धा वाचा : Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार? 

प्रत्यक्षात दिल्लीतील या पुराना किलाची बांधणी16 व्या शतकात हुमायूंकडून करण्यात आली होती. याच भागामध्ये उत्खनन करत येत्या काळात पुरातत्वं खात्याकडून पुराना किला भागात खरंच पांडवांचं अस्तिवं होतं का, इथं इंद्रप्रस्थ होतं का? यासंदर्भातील खुलासा केला जाणार आहे.