नवी दिल्ली : जर तुमची काही बँकेची कामे असतील तर ती उद्याच आटोपून घ्या. कारण मंगळवारी संपामुळे बँका बंद असणार आहेत.
देशभरातील बँकांच्या १ लाख ३२ हजार शाखांमधील एकूण १० लाख बँक कर्मचारी २२ ऑगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.
बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या ११ व्या वेतनकराराची पूर्तता वेळेवर व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी हा संप केला जाणार आहे.
या संपामुळे पैशांच्या देवाण घेवाण व्यवहारावर परिणाम होणार आहे. मात्र, मोबाईल बॅंकींग आणि एटीएम सेवांवर कोणताही परिणाम होणार नाहीये. देशभरातील नऊ मोठ्या बँक युनियन या संपात सहभागी होणार असल्याची माहिती यूएफबीयूनं दिली आहे.