मुंबई : आजच्या ऑप्टिकल इल्यूजन संबंधीत अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो दिसायला जरी अगदी साधे दिसत असले तरी ते खूपच रहस्यमयी असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये बरंच काही लपलेलं असतं. जे आपल्याला शोधून काढायचं असतं. खरंतर हे असे व्हिडीओ आपल्या मेंदूला विचार करायला भाग पाडतात. एवढंच काय तर ते आपल्या डोळ्यांना देखील धोका देतात. सध्या समोर आलेला ऑप्टीकल इल्यूजन फोटो देखील तसाच काहीसा आहे. या फोटोमध्ये एका महिलेचा चेहरा दिसत आहे आणि हा चेहरा तिचा उलटा असल्याचे दिसत आहे. परंतु त्यामागील वास्तव काही वेगळेच आहे.
हा फोटो समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा विचार करावा लागेल.
प्रसिद्ध गायिका ऍडेलचा हा फोटो बऱ्याच लोकांना विचारात पाडत आहे. तर काहीं लोकं हा फोटो म्हणजे एक प्रकारचा भ्रम असल्याचा दावा करत आहेत.
नेटिझन्सना वेड लावणारा ऑप्टिकल इल्युजन फोटो ऍडेलच्या 25व्या अल्बमचा फोटो आहे.
खरंतर तुम्ही हा फोटो उलटा पाहाता तेव्हा तुम्हाला ही महिला खूपच सुंदर दिसेल. परंतु तुम्ही जेव्हा हा फोटो सरळ पाहाल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये काहीतरी विचित्र असल्यासारखे जाणवेल.
आता या फोटोत काय विचित्र आहे? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या महिलेचे डोळे पाहा. तिचे डोळे उलटे आहे, म्हणजेच तिने आयलाइनल उलटं लावलं आहे. ज्यामुळे आपल्याला हा फोटो उलटे असल्याचा भ्रम होत आहे.
खरंतर तुम्ही या इल्यूजन फोटो आपल्यासमोर एक उदाहरण ठेवत आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक सुंदर दिसणारी गोष्ट सुंदर असेलच असे नाही.