फोनवर बोलत असतानाच पुलावरुन पडून आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

ऱस्त्यावरुन चालताना वा गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे धोकादायक ठरु शकते. यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात. सरकारने यासाठी अनेक नियमावलीही जाहीर केलीय. मात्र त्यानंतर लोकांच्या बेपर्वाईमुळे अशा घटना घडतात.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 29, 2018, 04:49 PM IST
फोनवर बोलत असतानाच पुलावरुन पडून आयटी कर्मचाऱ्याचा मृत्यू title=

चेन्नई :ऱस्त्यावरुन चालताना वा गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे धोकादायक ठरु शकते. यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात. सरकारने यासाठी अनेक नियमावलीही जाहीर केलीय. मात्र त्यानंतर लोकांच्या बेपर्वाईमुळे अशा घटना घडतात.

नुकतीच अशीच एक घटना चेन्नईत घडलीये. चेन्नई विमानतळावर सकाळी साडेसहाच्या सुमारास आयटीत काम करणाऱ्या व्यक्तीचा पुलावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये. ३२ वर्षीय चैतन्य वुयुरु असं या व्यक्तीचं नाव आहे. 

ही व्यक्ती आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथे राहणारी होती. फोनवर बोलताना ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

फोनवर बोलत असताना घडली घटना

पोलिसांच्या माहितीनुसार विमानतळावरील डोमेस्टिक टर्मिनलच्या गेट नंबर  ४ जवळ ही घटना घडली. पुलावर उभी राहून फोनवर बोलत असताना चैतन्यचा पाय घरला आणि तो खाली पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 

अपघात की आत्महत्या?

दरम्यान, ही आत्महत्या होती की अपघात याचा तपास केला जात आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाची उंची जमिनीपासून ३० फूट इतकी होती. पुलावरुन पडल्याने त्याच्या शरीरावर अनेक जखमी झाल्या. यातच चैतन्यचा मृत्यू झाला.