पाहा : सौंदर्यराणी...बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस

या एक्स्प्रेस गाडीची झलक डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2018, 06:54 PM IST
पाहा : सौंदर्यराणी...बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस  title=

नवी दिल्ली : बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस दिल्लीत पोहोचली आणि सर्वांच्या नजरा या गाडीवर खिळल्यात. कारणही तसंच होतं, ही रेल्वे आकर्षक रंगविण्यात आली होती. गाडीवर संस्कृतीची झलकही पाहायला मिळत होती.

बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस ही सौंदर्यराणी डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसला सौंदर्यराणीचे रुप आल्याची चर्चा येथे उपस्थितांमध्ये सुरु होती.  गुड आर्ट. एक्स्प्रेसच्या नऊ डब्यांवर मधुबनी कला साकारण्यात आलेली आहे. संस्कृतीची झलक दर्शवणारी चित्रे रेखाटली आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकात नुकतीच ही सौंदर्याची राणी अवतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.