बाळाचं नाव विचार करुन सरकारी नोंदणीत एकदाच नोंदवा

जन्माचा दाखला (birth certificate) हा अनेक महत्त्वाच्या दाखल्यापैकी एक आहे. जन्माचा दाखला अनेक ठिकाणी लागतो. काही कागदपत्र मिळवण्यासाठी तर जन्माचा दाखला हा बंधनकारक असतो. 

Updated: May 12, 2022, 07:57 PM IST
बाळाचं नाव विचार करुन सरकारी नोंदणीत एकदाच नोंदवा title=

मुंबई : जन्माचा दाखला (birth certificate) हा अनेक महत्त्वाच्या दाखल्यापैकी एक आहे. जन्माचा दाखला अनेक ठिकाणी लागतो. काही कागदपत्र मिळवण्यासाठी तर जन्माचा दाखला हा बंधनकारक असतो. मुलाच्या जन्माच्या अवघ्या काही दिवसांनी आपण जन्माचा दाखला आवश्यक के कागदपत्र जमा करुन मिळवतो. (birth certificate can be made even without the name of the child know full process)

मात्र अनेकदा पालकांना आपल्या नवजात पाल्याचं नाव काय ठेवायचं, याबाबत संभ्रम असतो. मात्र या अशा परिस्थितीतही तुम्ही जन्माचा दाखला मिळवू शकता. तुम्ही तुमच्या पाल्याच्या नावाशिवाय जन्माचा दाखला प्राप्त करु शकता.

नाव नाही मग दाखला कसा मिळणार? 

मुलाच्या नावाशिवाय जन्माचा दाखला मिळवू शकता. मात्र मुलाचं नामकरण केल्यानंतर जन्माच्या दाखल्यात पालल्याचं नाव जोडावं लागेल. जन्माच्या एका महिन्यानंतर मुलाचं नामकरण केल्यानंतर संबंधित विभागात नाव जोडावं लागेल. यानंतर पालकांना आपल्या मुलाचं अपडेटेड जन्माचा दाखला मिळेल.