अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश

पंजाब पोलिसांनी एका महिलेचा चांगलाच पर्दाफाश केला आहे. ही महिला साध्या भोळ्या पण पैसेवाल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची. त्यांना घरी बोलवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायची. या संबंधांचा व्हिडिओ बनवून नंतर त्या लोकांना ब्लॅकमेल करत असे. अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून या महिलेने अनेकांना चांगलाच गंडा घातला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 21, 2017, 09:33 PM IST
अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश title=

चंदिगड : पंजाब पोलिसांनी एका महिलेचा चांगलाच पर्दापाश केला आहे. ही महिला साध्या भोळ्या पण पैसेवाल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची. त्यांना घरी बोलवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायची. या संबंधांचा व्हिडिओ बनवून नंतर त्या लोकांना ब्लॅकमेल करत असे. अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून या महिलेने अनेकांना चांगलाच गंडा घातला आहे.

एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारींवरून पोलीसांनी केलेल्या कारवाईत हे एक रॅकेटच असल्याचे पूढे आले. या महिलेसोबत आणखी तीन साथीदारही या कामात गुंतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम कुमार पुत्र साधू राम निवासी डबवाली या व्यक्तीला एक तोतया इस्टेट एजंट नृरसिंह कॉलनीतील फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन गेला. त्या फ्लॅटमध्ये मंजू पुत्री इकबाल आणि तिची आई वीरपाल कौर तसेच, इकबाल सिंह आगोदरापासून होत्या. दरम्यान, त्या घरात आणखी एक व्यक्ती दाखल झाला. त्याने रामकुमारला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तेथील एका महिलेसोबत त्याची अश्लिल व्हिडिओ क्लिपही बनवली. ही क्लिप त्याने सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत राम कुमार याचेकडून रोख ५ लाख रूपये आणि ५ लाखांचे चेक घेतले.

दरम्यान, हे प्रकरण संपले असे समजून रामकुमार आपल्या कामाला लागला असता पुन्हा त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी कंटाळून रामकुमारने पोलिसांत तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करून घेत पोलिसांनी एका महिलेसह तिच्या तीन साथिदारांना ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणातील आणखी दोघे फरार आहेत.

विशेष म्हणजे ही महिला आपल्या वडिलांकडे राहते. काहीतरी निमित्त करून ती वडिलांना घराबाहेर पाठवत असे. तसेच, वडील बाहेर गेले की, आपल्या साथिदारांसोबत ती हा उद्योग करत असे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या टोळीकडून अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पंजाब केसरीने याबाबत वृत्त दिले आहे.