VIDEO: स्टेजवर बॉडी बिल्डिंग करत असतानाच वाजू लागलं 'चोली के पीछे' गाणं, त्यानंतर काय झालं पाहा...

Bodybuilder Dance Video Viral: पिळदार शरीरयष्टी असणारा हातरुण स्टेजवर आला आणि मग.... पाहा सोशल मीडियावर तुफान व्हारयल होणारा व्हिडीओ.   

सायली पाटील | Updated: Oct 18, 2023, 02:47 PM IST
VIDEO: स्टेजवर बॉडी बिल्डिंग करत असतानाच वाजू लागलं 'चोली के पीछे' गाणं, त्यानंतर काय झालं पाहा...
Bodybuilding Bodybuilder Danced on choli ke piche kya hai Video goes viral

Bodybuilder Dance Video Viral: 'माझं काय... गाणं वाजायची खोटी, माझे पाय आपोआपच थिरकू लागतात'... असं तुमच्याआमच्यापैकी अनेकजण म्हणतात. पण, प्रत्यक्षातही तसंच होतं का? उडच्या चालीची गाणी वाजू लागल्यावर तुमचेही पाय थिरकू लागतात का? हो म्हणायच्या आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा. कारण, दर दुसऱ्या व्यक्तीच्या सोशल मीडिया फीडवर हाच व्हिडीओ पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओंमध्ये सध्या एकाच व्हिडीओची सर्वाधिक चर्चा सुरुये. 

Add Zee News as a Preferred Source

रीलप्रेमींमध्ये (Insta reels) कमालीचं लोकप्रिय असणारं  'चोली के पीछे' हेच गाणं इथं वाजताना दिसतंय. कमाल गोष्ट म्हणजे या गाण्यावर एक पिळदार शरीरयष्टी असणारा बॉडी बिल्डर जबरदस्त ठेका धरताना दिसतोय. पाहतानाच लक्षात येत आहे की, ज्यावेळी हा स्पर्धक व्यासपीठावर बॉडी बिल्डिंग करत होता तितक्यातच तिथं  'चोली के पीछे' हे गाणं वाजू लागलं. बस्स, मग काय? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tarun Gill (@iamtarungill)

गाणं वाजू लागताच तिथं एकच कल्ला झाला. कारण, गोंधळून न जाता या तरुणानं गाण्यावरच ठेका धरण्यास सुरुवात केली आणि एखाद्या तरुणीलाही लाजवेल असा कमाल ठेका त्यानं धरला. बरं, हा जबरदस्त डान्स करताना त्यानं व्यायामानं कसलेलं शरीरही सर्वांनाच दाखवलं. त्याचे अॅब्स, कट्स पाहून समोरचेही थक्कच झाले. 

हेसुद्धा वाचा : हावरट...! डेटवर गर्लफ्रेंडनं खाल्ले 48 Oysters, खादाडी पाहून बॉयफ्रेंडनं काढला पळ 

'Killer....', 'मानलं भावा...', 'भाई क्या गजब है ये' या आणि अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आणि या बॉडी बिल्डरचं कौतुक केलं. सोशल मीडियावर या न त्या विषयाचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, त्यात या बॉडी बिल्डरचा व्हिडीओ भलतीच लोकप्रियता मिळवून जात आहे. काहींच्या मते तर हा व्हिडीओ म्हणजे एखाद्या विनोदी चित्रपटातील दृश्य. तर, काही नेटकऱ्यांच्या मते या तरुणाला त्यावेळी तिथं नेमकं काय आणि कसं सादरीकरण करावं याची शक्कल सुचणं कौतुकास्पद. तुम्हाला काय वाटतं? 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More