नाल्यात पडली वऱ्हाडींची कार, नवरदेवाच्या वडिलांसह ७ जणांचा मृत्यू

कार महामार्गावरुन नाल्यात कोसळली. 

शैलेश मुसळे | Updated: Apr 21, 2018, 09:10 AM IST
नाल्यात पडली वऱ्हाडींची कार, नवरदेवाच्या वडिलांसह ७ जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : दिल्लीजवळ असलेल्या गाजियाबादच्या वियज नगरमध्ये एक कार महामार्गावरुन नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 ते 3 जण जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना विजय नगरच्या एनएच 24 महामार्गावर घङली. कार रिव्हर्स घेत असतांना ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे.

गाजियाबादच्या अकबरपूर बेहरामपूरच्या राहणाऱ्या 21 वर्षाच्या रवी रस्तोगी याचं वऱ्हाड लग्नासाठी निघालं होतं. 12 नातेवाईकांसोबत नवरदेवचे वडील गाडीत बसले. पुढे ट्रॅफीक असल्याने ड्राईव्हरने गाडी रिव्हर्स घेतली. दरम्यान ड्राईव्हर फोनवर बोलत असतांना गाडी 20 फूट खोल नाल्यात जाऊन पडली. मृतांमध्ये रवी रस्तोगीचे वडील दुर्गा प्रसाद रस्तोगी, काका इंद्र प्रकाश रस्तोगी आणि परिवार यांच्या मृत्यू झाला. नवरदेवाच्या २ भाच्यांचा देखील यात दुर्दैवी मृत्यू झाला.