पुणे : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल आता भाजपमधून सावध पवित्रा घेतला जातोय.
नारायण राणेंसाठी मंत्रीपद सोडण्यास तयार आहे असं मी कधी म्हटलंच नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
दरम्यान, राणेंचा भाजप प्रवेशाविषयाची निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, मुख्यमंत्री आणि अमित शहा हेच काय ते ठरवतील. राज्याच्या कोअर कमिटीमध्ये सध्यातरी हा विषय नाही. असंही पाटील यांनी पुण्यात स्पष्ट केलंय.