मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, याबाबतीत मी पंतप्रधान मोदींसोबत...

मोदी सरकारवर नेहमी टीकास्त्र सोडणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना याबाबतीत पाठिंबा दर्शवला आहे.

Updated: Mar 2, 2022, 06:00 PM IST
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, याबाबतीत मी पंतप्रधान मोदींसोबत... title=

नवी दिल्ली : युक्रेन युद्धावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. असं त्यांनी म्हटलं आहे. यूक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. तेथील परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारत सरकारकडून यासाठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. (CM mamta banerjee on Ukraine-russia war)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी यावेळी म्हटलं की, पण मला एक प्रश्न आहे की, जर पंतप्रधानांना हे 3 महिन्यांपूर्वीच माहित होते, तर मग भारतीय मुलांना परत का नाही आणले? त्यांना परत आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नागरी विमान वाहतूक मंत्री तिथे उतरून भाषण देत आहेत. मला सरकारवर परराष्ट्र व्यवहारांवर टीका करायची नाही कारण आम्ही एक आहोत.'

यूक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही अनेक भारतीय तेथे अडकले आहेत. त्यांना बाजुच्या देशातून भारतात आणण्यासाठी विशेष विमान पाठवले जात आहेत. 

दरम्यान युक्रेनमधील भारतीय दूतावासाने खार्किवमधील भारतीय नागरिकांना तातडीची सूचना जारी करत. खार्किव ताबडतोब सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शक्य तितक्या लवकर पिसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बबयाकडे जा. 6 च्या आधी तेथे पोहोचण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.