कोरोना व्हायरस : भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात ठप्प

कोरोनानं अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा बँड वाजवला आहे.

Updated: Feb 9, 2020, 08:25 AM IST
कोरोना व्हायरस : भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात ठप्प  title=

मुंबई : चीनच्या कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली असून त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना आखत पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते केव्हीपी रामचंद्रराव यांनी राज्यसभेत बोलताना केली.

शिवाय, कोरोना व्हायरसमुळे तिथल्या बड्या कंपन्यांना देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनानं चायनाचं कंबरडं मोडलंय. चीनमध्ये अॅपल फोनची ४२ शो रुम्स बंद आहेत. तर स्टारबक्सचे चार हजारांच्या वर कॅफे बंद पडलेत. कोरोनानं अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा बँड वाजवला आहे.

कोरोना व्हायरसने आतापर्यंत ७१७ पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे ३४ हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागन झाली आहे. अवघ्या जगाने कोरोनो व्हायरसचा धसका घेतला आहे. भारतात पहिला संशयित केरळमध्ये आढळलाय. 

त्यामुळे कोरोना केरळलगत असलेल्या कोकणात कधीही प्रवेश करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीनं आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

एकूणच कोकणात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी पुढचे काही दिवस आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणांना अधिक सतर्क रहावं लागणार आहे.