इंटेक्सने बाजारात आणला नवा स्मार्ट टीव्ही, ही आहे खासियत

प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी इंटेक्स टेक्नॉलॉजीने आपल्या ‘स्मार्ट’ टीव्ही पोर्टफोलियोचा विस्तार करत मंगळवारी ४३ इंचाचा अल्ट्रा हाय-डेफिनेशन(यूएसडी) टीव्ही लॉन्च केलाय.

Updated: Aug 8, 2017, 07:50 PM IST
इंटेक्सने बाजारात आणला नवा स्मार्ट टीव्ही, ही आहे खासियत title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी इंटेक्स टेक्नॉलॉजीने आपल्या ‘स्मार्ट’ टीव्ही पोर्टफोलियोचा विस्तार करत मंगळवारी ४३ इंचाचा अल्ट्रा हाय-डेफिनेशन(यूएसडी) टीव्ही लॉन्च केलाय.

‘एलईडी बी ४३०१ यूएचडी एसएमटी’ ४के एलईडी टीव्हीची किंमत ५२ हजार ९९० रूपये इतकी आहे. या टिव्हीमध्ये ३८४०- २१६० पिक्सल रिझोल्यूशनचा यूएचडी पॅनल देण्यात आलाय. ज्याला फ्रेम रेट, कॉन्ट्रास्ट आणि कलर डायनेमिक्स सपोर्ट करतं. 

हा स्मार्ट टीव्ही अ‍ॅन्ड्रॉईड ५.१ ऑपरेटींग सिस्टमवर काम करतो. तसेच यात १.१ गीगाहर्ट्सचं क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आलं आहे. त्यासोबत २.५ जीबी रॅम आणि ८ जीबी रोम दिलं आहे. इंटेक्स टेक्नॉलॉजीचे निर्देशक आणि व्यापार प्रमुख निधी मरक डे यांनी सांगितले की, ‘या नव्या मॉडलसोबतच इंटेक्सने आपल्या ‘स्मार्ट’ एलईडी पोर्टफोलियोमध्ये डेव्हलपमेंट केलीये. त्यामुळे आमचे प्रॉडक्ट वापरणा-या ग्राहकांच्या गरजा पूर्ण होणार आहेत’.

या टीव्हीमध्ये मीराकास्ट फिचर देण्यातं आलंय, ज्याने स्मार्टफोन लॅपटॉप आणि टॅबलेटसारख्या डिव्हाईसला जोडण्यासाठी वायफायच्या माध्यमातून वायरलेस संपर्क करतो. त्यासोबतच एचडीएमआई, यूएसबी पोर्ट्स आणि इन-बिल्ट ब्लूटूथही देण्यात आलंय. ज्याने होम थिएटर आणि स्पीकरला वायरलेस ऑडिओ पद्धतीने जोडतं. तसेच या स्मार्ट टीव्हीमध्ये इंटेक्सचं अ‍ॅप स्टोर इनबिल्ट करण्यात आलं आहे.