भारतात कोरोनामुळे अनेकांनी गमावला जीव, ५० हजारावर आकडा

लोकसंख्येच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे कमी बळी

Updated: Aug 17, 2020, 06:06 PM IST
भारतात कोरोनामुळे अनेकांनी गमावला जीव, ५० हजारावर आकडा  title=

मुंबई : भारतात कोरोनामुळे गमावलेल्या नागरिकांचा आकडा हा ५० हजारच्या पार गेला आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी मृतांचा आकडा कमी असला तरीही जगाच्या तुलनेत भारतातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. १७ ऑगस्ट रोजी ५० हजार मृतांचा आकडा पार केला आहे. 

जॉन्स हॉपकिन्स युनिर्व्हसिटी सेंटर फॉर सिस्टम साइंस एण्ड इंजिनिअरिंग (JHU CSSE) यांनी ही आकडेवारी शेअर केली आहे. जगात तीन देश असे आहेत जिथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे. अमेरिकेत १,७२ लाख, ब्राझीलमध्ये १.०७ लाख आणि मेक्सिकोमध्ये ५६,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. 

भारतात कोरोनामुळे पहिला बळी हा १२ मार्च रोजी झाला आहे. सौदी अरबमधून आलेल्या कर्नाटकमधील ७६ वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. १० हजारांचा आकडा पार करण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागला. मात्र अखेरच्या १० हजार रुग्णांचा मृत्यू १० दिवसांत झाला. 

भारतात प्रत्येक दिवशी १००० रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू होतात. कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असताना मृतांचा आकडा मात्र तेवढा वाढलेला नाही.