Crime News : आपल्या कुटुबांच्या ओढीने सुट्टीत घरी आलेल्या लष्कारातील जवानाची (Army Jawan) हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला आणि अवघ्या 24 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. भारतीय लष्करातील जवानाची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचं उघड झालं. लष्करातील जवान परना उरांव यांची हत्या त्यांची पत्नी बुधेश्वरी देवीने केली. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (wife killed army jawan husband)
सुट्टीत घरी आलेल्या जवानाची हत्या
झारखंडमधल्या गुमला जिल्ह्यात राहणारे परना उरांव हे सुट्टीत आपल्या घरी आले होते. ज्या दिवशी आले त्याच रात्री त्यांची हत्या झाली. याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धावत तपास सुरु केला. परना उरांव यांची पत्नी बुधेश्वरीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच अज्ञात आरोपी घरात घुसले आणि त्यांनी धारदार शस्त्राने परना उरांव यांची हत्या केली. पण बुधेश्वरीने सांगिलेली कहाणी पोलिसांना संशयास्पद वाटली.
पती आणि पतीमध्ये झालं जोरदार भांडण
5 जानेवारीला परना उरांव हे घरी आले होते. 11 जानेवारीला पती परना उरांव आणि पत्नी बुधेश्ररीदरम्यान जोरदार भांडण झालं. बुधेश्वरी अनैतिक संबंधांची कुणकुण परना उरांव यांना लागली होती. यातून त्यांचं भांडण झालं. संधी मिळताच बुधेश्वरीने परना उरांव यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने परना उरांव बेशुद्ध पडले. यावेळी बुधेश्वरीने आपल्या प्रियकर विनय लाकडा याला घटनेची माहिती दिली आणि घरी बोलावून घेतलं.
हत्येचा रचला बनाव
बुधेश्वरी देवी आणि तिचा प्रियकर विनय लाकडा यांनी हत्या लपवण्यासाठी बनाव रचला. पाच ते पाच अज्ञात लोकांनी धारदार शस्त्राने पती आणि आपल्यावर हल्ला केल्याचं बुधेश्वरी देवीने सांगितलं. हल्ला केल्याचं खरं वाटावं यासाठी विनय लाकडा याने बुधेश्वरीलाही जखमी केलं, त्यानंतर घरातील वस्तू विखुरल्या आणि दरवाजाची कडीही तोडली. त्यानंतर विनय लाकडा तिथून निघून गेला. प्रियकर निघून गेल्यानंतर बुधेश्वरीने नातेवाईक आणि शेजाऱ्यांना आपल्या घरावर हल्ला झाल्याची माहिती दिली. नागरिकांनी परना उरांव आणि बुधेश्वरी देवीला रुग्णालयात दाखल केलं. इथं रुग्णालयात डॉक्टरांनी लष्कर जवान परना उरांव यांना मृत घोषित केलं.
पोलिसांना होता संशय
बुधेश्वरी देवी आणि विनय लकडा यांचे प्रेमसंबंध होते. बुधेश्वरीला पतीला सोडून विनय लाकडा याच्याशी लग्न करायचं होतं. याची माहिती परना उरांव यांना लागली होती. याच दरम्यान तो सुट्टीवर घरी आला होता. पतीची हत्या करुन एकत्र राहण्याचा दोघांचा प्लान होता. इतकंच नाही तर त्याची संपत्ती लाटण्याबरोबर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याचा कटही त्यांनी रचला होता. पण पोलिसांना सुरुवातीपासून बुधेश्वरीच्या जबाबात संशयास्पद आढळलं होतं.
पोलीस खाक्या दाखवताच बुधेश्वरीने आपणच पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. याप्रकरणी पोलिसी बुधेश्वरी आणि तिचा प्रियकार विनय लाकडा यांना अटक केली आहे.