दारूल उलूम देवबंदची मुस्लिम महिलांच्या हातावर करडी नजर

काय आहे हा अजब फतवा 

दारूल उलूम देवबंदची मुस्लिम महिलांच्या हातावर करडी नजर  title=

मुंबई : दारूल उलूम देवबंदने एका महिलेच्या विरोधात केवळ यासाठी फतवा जाहीर केला की, त्या महिलेने आपल्या नखांवर नेल पॉलिश लावली होती. फतव्यात असं सांगितलं आहे की, महिलांसाठी नख कापणे आणि नखांवर नेल पॉलिश लावणं हे इस्लामच्या विरूद्ध आहे. दारूल उलूमचे मुफ्ती इशरार गौरा यांनी सांगितलं की, इस्लाममध्ये महिला आपल्या नखांवर मेहंदी लावू शकतात. मात्र नेल पॉलिश चुकीची समजली जाते. दारूल उलूम यांनी या अगोदर देखील महिलांच्या वेगळ्या गोष्टींच्या विरोधात फतवा लागू केला आहे. 

गेल्यावर्षी 21 ऑक्टोबरला दारूल उलूम देवबंदने देखील असाच फतवा जाहीर केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर मु्स्लिम पुरूष आणि महिलांचे फोटो अपलोड करणे चुकीचे आहे. दारूम उलूम देवबंदमधील एका व्यक्तीने हा प्रश्न उपस्थित केला होता. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर फोटो अपलोड करणे चुकीचे आहे. कारण इस्लाम धर्म यांची परवानगी देत नाही. 

महिलांनी आयब्रो करणं आणि केस कापणं देखील चुकीचे 

7 ऑक्टोबरला दारूम उलूम देवबंदने मुस्लिम महिलांविरोधात अतिशय धक्कादायक फतवा जाहीर केला होता. मुस्लिम महिलांनी हेअर कटिंग आणि आयब्रो करणं देखील चुकीचे हआहे. यावर मौलाना लुतफुर्रहमान सादिक कासमीने सांगितलं होतं की. हा फतवा खूप अगोदर जाहीर करायला हवा होता.