सुनांकडून सासूला बेदम मारहाण! मुलं बाजूला उभं राहून देत होती प्रोत्साहन; महिलेचा मृत्यू

Daughter In Law Beat Mother In Law Women Died: हा सारा प्रकार गावातील रस्त्यांवर सुरु असल्याचं पाहून गावकऱ्यांनीच पोलिसांना फोन करुन सदर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गावात धाव घेऊन या महिलेची सुटका केली

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 16, 2024, 09:22 AM IST
सुनांकडून सासूला बेदम मारहाण! मुलं बाजूला उभं राहून देत होती प्रोत्साहन; महिलेचा मृत्यू title=
या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला

Daughter In Law Beat Mother In Law Women Died: मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दोन महिलांनी आपल्या सासूला बेदम मारहाण करुन जीवे मारल्याचा प्रकार घडला आहे. ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेला तिच्या सुना मारहाण करत असताना तिची मुलं म्हणजेच मारहाण करणाऱ्या महिलांचे पती दोघींना प्रोत्साहन देत होते. या दोन्ही महिलांनी आपल्या सासूला दगड आणि काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनीच केला पोलिसांना फोन

वयस्कर महिलेला तिच्याच सुनांकडून बेदम मारहाण होत असल्याचं पाहून गावकऱ्यांनीच पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेसंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली. पोलिसांनी या महिलेला तिच्या सुना आणि मुलांच्या तावडीतून सोडवलं तेव्हा ती जिवंत होती. मात्र रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या महिलेचं नाव मुन्नी देवी असं आहे. मुन्नी देवी 55 वर्षांच्या होत्या.

सुनांकडून डोक्यावर काठीने वार

या प्रकरणामध्ये पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणामध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या दोन्ही सुना, धाकटा मुलगा, सुनेचे वडील आणि सुनेच्या दोन भावांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक केली असून त्यामध्ये धाकट्या सुनेचा समावेश आहे. मुन्नी देवी यांना त्यांच्या सुनांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही सुना या महिलेच्या डोक्यावर काठीने वार करत असल्याचं दिसत आहे. या महिलेला दोघींनी फरपटत नेलं. या महिला सासूला मारहाण करत होत्या तेव्हा तिचा मुलगा दोघींना प्रोत्साहन देत बाजूला उभा होता. या मारहाणीमध्ये धाकट्या सुनेच्या माहेरचे लोकही सहभागी होते. 

नक्की वाचा >> नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस निरिक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेदम मारहाण झाल्याने मुन्नी देवी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी धाकटी सून चंदा, तिचे वडील अमर सिंह आणि भाऊ अजय-विजय असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. धतीया पोलिसांनी चंदाबरोबरच तिचे वडील अमर सिंह आणि भाऊ विजयला अटक केली आहे. 

नेमका वाद काय होता?

प्राथमिक तपासामध्ये थोरली सून असलेल्या सावित्रीने 2 वर्षांपूर्वी आपल्या सासूला मारहाण केली होती. त्यावेळेस मुन्नी देवी यांच्या डोक्याला सहा टाके पडले होते. त्यानंतर मुन्नी देवी आपल्या थोरल्या लेकापासून वेगळ्या राहू लागल्या होत्या. या प्रकरानंतर काही दिवसांनी धाकटा मुलगा रवीचं चंदा कुमारीबरोबर लग्न झालं. लग्नानंतर चंदा आणि सावित्री दोघींचं चांगलं जमू लागलं. मात्र या दोघींमधील चांगलं नातं मुन्नी देवीला पडत नव्हतं. मुन्नीने चंदाचा छळ सुरु केला. त्यानंतर चंदाने तिचे वडील अमर सिंह, भाऊ अजय आणि विजय यांच्या मार्फत पंचायतीमध्ये तक्रार दाखल केली. या सुनावणीदरम्यान तिथे थोरला मुलगा आणि थोरली सून सावित्रीही आली. मुन्नी देवी ओरडून ओरडून आपली बाजू मांडत होत्या. अचानक सावित्रीने मुन्नी देवींना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चंदाही सासूला मारहाण करु लागली. दोन्ही मुलं आपल्या बायकांना आईला मारण्यासाठी प्रोत्साहन देत होती. 

उपचारादरम्यान मृत्यू

गावकऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात कळवलं. पोलीस गावात पोहचेपर्यंत मुन्नी देवी गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांना ग्वाल्हेरमधील जयारोग्य रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान मुन्नी देवी यांनी प्राण सोडले.