दाऊद पाकिस्तानात असला तरी आम्ही भारताची मदत का करू? : परवेज मुशर्रफ

भारताचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद भलेही पाकिस्तानत असेल पण, आम्ही भारताची मदत का करू, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी केले आहे. पाकिस्तानातील एका न्यूज चॅनलला दिलेल्या  मुलाखतीत मुशर्रफ यांनी ही हे विधान केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 31, 2017, 04:02 PM IST
दाऊद पाकिस्तानात असला तरी आम्ही भारताची मदत का करू? : परवेज मुशर्रफ title=

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद भलेही पाकिस्तानत असेल पण, आम्ही भारताची मदत का करू, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी केले आहे. पाकिस्तानातील एका न्यूज चॅनलला दिलेल्या  मुलाखतीत मुशर्रफ यांनी हे विधान केले आहे.

पाकिस्तानी टीव्ही चॅनल दुनिया न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुशर्रफ हे विधान केले आहे. या वेळी बोलताना मुशर्रफ म्हणतात, भारत गेल्या कित्येक वर्षांपासून आरोप करत आला आहे की, दाऊद पाकिस्तानात आहे. पण, आम्ही चांगले का बनावे आणि चांगले बनून भारताला मदत का करावी. दरम्यान, अर्थातच मला माहित नाही की, दाऊद कोठे आहे. पण त्याचे इथे असणे असो किंवा इतरत्र कोठे असणे आम्ही त्याचा ठावठिकाणा का सांगावा, असेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे.

मुलाखती दरम्यान एकूण बॉडी लॅंग्वेज पाहता दाऊद कोठे आहे हे याची पक्की माहिती मुशर्रफ यांना असावी असे दिसते. १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दाऊद प्रमुख आरोपी आहे. या बॉम्ब स्फोटात शेकडो लोक मारले गेले होते. भारतात बॉम्ब स्फोट का झाले याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे पण, भारत यावर चर्चा करू इच्छित नाही, असेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे.