'राहुल गांधी आज ED चौकशीला उपस्थित राहणार नाहीत'

Ed Summons to MP Rahul Gandhi In Money Laundering Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे. पण राहुल परदेशात असल्यामुळे ते आज चौकशीला उपस्थित राहणार नाहीत.  

Updated: Jun 2, 2022, 12:13 PM IST
'राहुल गांधी आज ED चौकशीला उपस्थित राहणार नाहीत'  title=

नवी दिल्ली : Ed Summons to MP Rahul Gandhi In Money Laundering Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी ( Congress Chief Sonia Gandhi ) आणि राहुल गांधी यांना ED ने नोटीस पाठवली आहे. राहुल यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे. पण राहुल गांधी परदेशात असल्यामुळे ते आज चौकशीला उपस्थित राहणार नाहीत. सोनिया गांधी यांना 8 जूनला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँडरिंग ( Money Laundering Case) केल्याचा ठपका ठेवत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीच्या या समन्समुळे गांधी परिवाराच्या समस्या वाढल्या आहेत. 

ED ने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावल्यानंतर काँग्रेसडून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची फाईल सक्तवसुली संचलनालयानं 2015 मध्ये बंद केली होती. मात्र आता ईडीने सोनिया आणि राहुल गांधी यांना समन्स पाठवले आहे.

ED ने सोनिया आणि राहुल गांधी यांना 8 जूनला चौकशीसाठी बोलावले आहे. सोनिया चौकशीला उपस्थित राहतील. राहुल सध्या परदेशात आहेत.  8 तारखेपर्यंत राहुल मायदेशी परतल्यास ते देखील ED च्या कार्यालयात जातील. अन्यथा ED कडून अधिकचा वेळ मागण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी काल पत्रकार परिषदेत EDवर निशाणा साधला. हे षडयंत्र आहे आणि त्यामागे पंतप्रधान आहेत. ED त्यांची पाळीव एजन्सी आहे. मोदी सरकार बदल्याच्या भावनेत आंधळं झालं आहे. EDची नोटीस म्हणजे भित्रेपणाचे लक्षण आहे. नॅशनल हेरॉल्ड 1942 मधील वृत्तपत्र आहे. त्यावेळी ब्रिटिश सरकारने या वर्तमानपत्राची मुस्कटदाबी करण्याचे काम केले. आता मोदी सरकार EDचा वापर करgन तेच करत आहे, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

काय आहे प्रकरण?

'द असोसिएटेड जर्नल लिमिटेड' या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी स्थापन केलेले 'नॅशनल हेरॉल्ड' हे वृत्तपत्र  2008 मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या 'यंग इंडिया' कंपनीने 2010मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने 'नॅशनल हेराल्ड'ला 90 कोटींचे कर्ज दिले होते. 'द असोसिएटेड जर्नल'ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या 50 लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी 38 टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.